काँग्रेसला दूर ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर
विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी तिसऱ्या आघाडीची चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भुवनेश्वरमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांची भेट घेतली. West Bengal CM Mamata Banerjee met Odisha CM Naveen Patnaik in Bhubaneswar
विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी कोलकाता येथे नुकत्याच केलेल्या चर्चेनंतर ही भेट झाल्याने, या बैठकीला महत्त्व आले आहे. या बैठकीत काँग्रेसला दूर ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.
ममता बॅनर्जी यांचे शुक्रवारी कोलकाता येथे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. याशिवाय ममता बॅनर्जी या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी केंद्रावर बंगालवर अन्याय आणि निधी नाकारल्याचा आरोप करत आहेत. त्याचबरोबर केजरीवाल केंद्र सरकारवर हुकूमशाही वृत्तीचा आरोप करत आहेत.
राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की ममता बॅनर्जी आणि पटनायक यांच्या भेटीत बरेच काही होते. कारण २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ओडिशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. ममता बॅनर्जींना तिसऱ्या आघाडीत नवीन पटनायक यांचा पाठिंबा हवा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
West Bengal CM Mamata Banerjee met Odisha CM Naveen Patnaik in Bhubaneswar
महत्वाच्या बातम्या
- ‘’… तर नारायण राणे शिवसेना सोडून गेलेच नसते’’ म्हणत राज ठाकरेंनी सांगितला तेव्हा घडलेला प्रसंग!
- माहीमचा अनधिकृत दर्गा तोडा; नाहीतर तिथेच गणपती मंदिर उभारु… राज ठाकरेंचा इशारा
- मोदी, शहा जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस होतील असं सांगत होते तेव्हा का नाही आक्षेप घेतला? – राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल!
- राज ठाकरेंची सभा, “निवडलेले” विषय; शिंदे – फडणवीसांनी योगी स्टाईल बुलडोझर चालविण्यासाठी ट्रिगर पॉईंट!!