west bengal bjp targets tmc : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारने बोर्डाच्या टॉपर विद्यार्थ्याचा उल्लेख तो मुस्लिम असल्याचा म्हणून केला आहे. यावर विरोधी पक्ष भाजपने तीव्र आक्षेप नोंदवत तृणमूलला धारेवर धरत तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत मुर्शिदाबादची रुमाना सुलताना ही मुलगी टॉपर आली आहे. पश्चिम बंगाल भाजपने ममता सरकारला सवाल केला की, जर एखाद्याने परीक्षेत प्रथम स्थान मिळवले असेल तर त्याच्या धर्मावर नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेवर जोर दिला पाहिजे. west bengal bjp targets tmc alleges appeasement by targeting board topper as muslim
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारने बोर्डाच्या टॉपर विद्यार्थ्याचा उल्लेख तो मुस्लिम असल्याचा म्हणून केला आहे. यावर विरोधी पक्ष भाजपने तीव्र आक्षेप नोंदवत तृणमूलला धारेवर धरत तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत मुर्शिदाबादची रुमाना सुलताना ही मुलगी टॉपर आली आहे. पश्चिम बंगाल भाजपने ममता सरकारला सवाल केला की, जर एखाद्याने परीक्षेत प्रथम स्थान मिळवले असेल तर त्याच्या धर्मावर नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेवर जोर दिला पाहिजे.
मुर्शिदाबाद कंडी येथील राजा मनिंद्र चंद्र गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी रुमाना सुलतानाने डब्ल्यूबीसीएचएसई उच्च माध्यमिक परीक्षेत 500 पैकी 499 गुण मिळविले आहेत. कथितरीत्या ती अल्पसंख्याक समाजातील टॉप करणारी पहिली मुलगी आहे.
पश्चिम बंगाल उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा डॉ. महुआ दास यांनी मुलीच्या धर्मावर भर देताना म्हटले आहे की, “मी तिचे नाव घेणार नाही परंतु मला वाटते की मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मुस्लिम मुलगी म्हणून तिने इतिहास घडविला आहे, तिला 499 गुण मिळाले आहेत.”
यावर हल्ला चढवत आसनसोलचे भाजपा आमदार आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा अग्निमित्र पॉल यांनी ट्वीट केले की, “निकाल जाहीर झाल्यावर एचएस कौन्सिलच्या अध्यक्षा महुआ दास म्हणतात की, मुस्लिम मुलीने प्रथम क्रमांक मिळविला आहे, पण मला समजले नाही की त्यांनी त्या मुलीला मुस्लिम का म्हटले? जर हिंदू विद्यार्थी आधी आला असता तर त्याची हिंदू ओळख सांगितली असती का? एवढा क्षुद्र विचार पाहून स्तब्ध झाले आहे.”
याविषयावर भाजप आयटी सेलचे मुख्य अमित मालवीय आणि विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनीही ट्वीट करून तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
west bengal bjp targets tmc alleges appeasement by targeting board topper as muslim
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Floods : राज्यातील गंभीर पूर संकटावर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन, तातडीने मदत पोहोचवा
- महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, NDRFची 26 पथके, 4 हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
- Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? १२१ व्हिडिओंसाठी १२ लाख डॉलर्सचा रेट, मुंबई पोलिसांची माहिती
- Maharashtra Landslide : राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- Maharashtra Landslide Updates : राज्यात 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू, अजित पवारांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मागितली मदत