वृत्तसंस्था
कोलकाता – मोठ्या लढाईसाठी काही त्याग करावा लागतो… मी नंदीग्राममध्ये लढले… तिथल्या जनतेने कौल दिलाय. मी त्या जनतेचा कौल मान्य करते, असे वक्तव्य करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधील आपल्या स्वतःच्या पराभवावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ऐतिहासिक विजयानंतर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. West bengal assembly elections 2021 reactions mamata banerjee nandigram loss
ममता बॅनर्जी म्हणाल्या की ही मॅच होती. नंदीग्रामच्या जनतेने कौल दिला. संपूर्ण बंगालच्या जनतेने तृणमूळ काँग्रेसला जबरदस्त विजय मिळवून दिला आहे. मी नंदीग्रामचा पराभव विसरले आहे. त्याने काही फरक पडत नाही. भाजपने बंगालमध्ये घाणेरडे राजकारण खेळले. मोठ मोठे अधिकारी आम्हाला सांगायचे तुमच्यावर वॉच ठेवला जातोय. पण खेला झाला आहे. बंगालच्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केले आहे. आता या पुढची लढाई कोविडशी आहे आणि ती एकजूटीने लढायची आहे, याकडे ममता बॅनर्जी यांनी लक्ष वेधले.
एकाच वेळी त्या मी काही विसरणार नाही, असे म्हणाल्या आणि पुढचेच विधान त्यांनी सगळे विसरून पुढे वाटचाल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडे त्यांनी संपूर्ण देशातील कोरोना लसीकरणासाठी ३० हजार कोटींची मागणी केली. ही रक्कम केंद्र सरकारला अजिबात ज़ड नाही, असे विधानही त्यांनी केले.
विजय मिळविल्यानंतर देखील ममता बॅनर्जी यांनी आज निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधला. त्याचवेळी ममतांनी नंदीग्राममध्ये आपला सुवेंदू अधिकारींनी केलेला पराभव मान्य केला. आधी ममता दमत – भागत १२०० मतांनी जिंकल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने जाहीर केले होते. पण प्रेस कॉन्फरन्समध्ये ममतांनी आपला स्वतःचा पराभव मान्य केला.
एकीकडे हा विजय बंगाली माणसाचा, भारतीयांचा आणि लोकशाहीचा आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपचा एजंट असल्यासारखा वागल्याचा आरोप केला. निवडणूक आयोगाविरोधात सुप्रिम कोर्टाच्या घटनापीठाकडे दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला.
निवडणूकीत जे आरोप ममतांनी भाजपवर लावले. त्या सगळ्या आरोपांचा त्यांनी पुनरूच्चार केला. त्याच वेळी त्यांनी लोकशाही, राज्यघटना स्पिरीटचा उल्लेख केला. बंगालमध्ये भाजपने धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मनी, मसल, माफिया पॉवरचा वापर करून निवडणूक लढविली. पण बंगाली जनतेने त्यांचा पराभव केल्याचे वक्तव्य ममतांनी केले.
West bengal assembly elections 2021 reactions mamata banerjee nandigram loss
महत्त्वाच्या बातम्या
- Tamil nadu Assembly Election २०२१ Result Live Updates : तमिळनाडूमध्ये द्रमुकची विजयाकडे घोडदौड, पहिल्या दोन तासांत १२९ जागांवर आघाडी; अद्रमुक पिछाडीवर
- पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे भगीरथ भालके चौथ्या फेरीअखेर आघाडीवर, पारडे सारखे वर – खाली
- Assam Election Result LIVE : 10 वाजेपर्यंतचा कल, आसामात भाजप 50 हून जास्त जागांवर पुढे, तर काँग्रेस मागे, पाहा अपडेट्स
- West Bengal Assembly Election 2021 Results Live : बंगालमधील या उमेदवारांकडे व मतदारसंघांकडे जरूर द्या लक्ष… तिथे आहेत लक्षवेधी लढती
- West bengal assembly elections 2021 results updates : ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये पिछाडीवर, सुवेंदू अधिकारी आघाडीवर