• Download App
    शुभमंगल 'सावधान' : लग्नाआधी पॉझिटिव्ह झाला नवरदेव, नवरीने पीपीई किट घालून कोविड सेंटरमध्येच केले लग्न । Wedding In Corona Ward As Bridegroom Corona positive, bride wears PPE Kit in Alappuzha Kerala

    शुभमंगल ‘सावधान’ : लग्नाआधी पॉझिटिव्ह झाला नवरदेव, नवरीने पीपीई किट घालून कोविड सेंटरमध्येच केले लग्न

    Wedding In Corona Ward :  देशात कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांच्या अनेक व्यवहारांवर बंधने आली आहेत. लग्नालाही ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर अवघ्या दोन तासांत लग्न उरकण्याचे निर्देश आहेत. याशिवाय 25 व्यक्तींच्या वर एकाही व्यक्तीला लग्नाला उपस्थित राहता येणार नाही. कोरोना महामारीमुळे अनेकांचे विवाह पुढे ढकलले आहेत. एकतर लग्नासाठी एवढे सगळे नियम पाळायचे, त्यात नवरदेवच पॉझिटिव्ह आला तर? हो असे झाले आहे. केरळात नवरदेव कोरोना संक्रमित असूनही ठरलेल्या तारखेलाच लग्न पार पडले. तेही कोविड वॉर्डमध्ये. यावेळी नवरी पीपीई किट घालून बोहल्यावर चढली. Wedding In Corona Ward As Bridegroom Corona positive, bride wears PPE Kit in Alappuzha Kerala


    वृत्तसंस्था

    अलप्पुझा : देशात कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांच्या अनेक व्यवहारांवर बंधने आली आहेत. लग्नालाही ठराविक व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. महाराष्ट्रात तर अवघ्या दोन तासांत लग्न उरकण्याचे निर्देश आहेत. याशिवाय 25 व्यक्तींच्या वर एकाही व्यक्तीला लग्नाला उपस्थित राहता येणार नाही. कोरोना महामारीमुळे अनेकांचे विवाह पुढे ढकलले आहेत. एकतर लग्नासाठी एवढे सगळे नियम पाळायचे, त्यात नवरदेवच पॉझिटिव्ह आला तर? हो असे झाले आहे. केरळात नवरदेव कोरोना संक्रमित असूनही ठरलेल्या तारखेलाच लग्न पार पडले. तेही कोविड वॉर्डमध्ये (Wedding In Corona Ward). यावेळी नवरी पीपीई किट घालून आली होती.

    केरळमधील अलप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये एका कोविड वॉर्डमध्ये एका दांपत्याचे नुकतेच लग्न झाले. काही दिवसांपूर्वी नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यावर त्या कोविड वॉर्डमध्येच उपचार सुरू होते. आलप्पुझा येथील कनकरीचे मूळ रहिवासी असलेल्या सारथ सोम आणि अभिरामी या दोघांनी कोविड वॉर्डमध्ये लग्न केले आहे. यावेळी नवरीने पीपीई किट घालून कोविड पॉझिटिव्ह नवरदेवाला वरमाला घातली.

    ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी वराला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर त्याला कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. कनकरी येथील राहणाऱ्या सारथ आणि अभिरामीचे लग्न होण्यासाठी वधूला पीपीई किट परिधान करायला लावून रुग्णालयात आणण्यात आले होते. हे दृश्य पाहून चिंतातूर कोरोनाग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

    परदेशात काम करणार्‍या सारथला लग्नाच्या तयारीदरम्यान कोरोनाची लागण झाली. नंतर, आईलादेखील लागण झाली. यामुळे दोघांनाही अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमधील कोविड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर कुटुंब आणि नातेवाईकांनी 25 एप्रिल रोजी होणारे लग्न पुढे ढकलण्यास सहमती दर्शविली होती. पण तरीही एकदा प्रयत्न तर करून पाहू म्हणून जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली. आवश्यक परवानगी घेतल्यानंतर त्यांनी कोविड वॉर्ड गाठले आणि तेथेच त्यांचे लग्न झाले. अख्ख्या कोरोना वॉर्डातील रुग्ण या लग्नाचे वऱ्हाडी बनले होते.

    Wedding In Corona Ward As Bridegroom Corona positive, bride wears PPE Kit in Alappuzha Kerala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!