• Download App
    पतीला आयपीएसची वर्दी चढविणे महिला डीवायएसपीला पडले महागात, थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला प्रकार|Wearing IPS uniform to husband costly for female DYSP, complaint reaches directly to PM's office

    पतीला आयपीएसची वर्दी चढविणे महिला डीवायएसपीला पडले महागात, थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला प्रकार

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : स्वत: डीवायएसपी (पोलीस उपअधीक्षक) असूनही रुबाब दाखविण्यासाठी पतीही आयपीएस अधिकारी असल्याचा बनाव करणे चांगलेच महामागत पडले आहे. बिहारच्या पोलीस अधीक्षक रेशु कृष्णा यांची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेली आहे. पतीला आयपीएस अधिकाऱ्याची खोटी वर्दी चढविणे त्यांना चांगलेच महागात पडले आहे.Wearing IPS uniform to husband costly for female DYSP, complaint reaches directly to PM’s office

    भागलपूरमधील कहलगाव येथे रेशू कृष्णा या पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यांनी पतीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात त्या पोलीसाच्या पोषाखात असून, त्यांच्यासोबत त्यांचे पतीही आयपीएसच्या वर्दीत दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. युनीफॉर्ममधील जोडप्याचे खूप कौतुक झाले. मात्र, काही सोशल मीडिया यूजरनी कृष्णा यांचे पती आयपीएस नसल्याचे शोधून काढले. त्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला.



    या प्रकाराची तक्रार काही जणांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली. कृष्णा या स्वत:ही आयपीएस नसून राज्यसेवा परीक्षेतून आलेल्या आहेत. त्यांचे पती तर काहीच काम करीत नसल्याचे समोर येत आहे. त्यांनी आपले आयपीएस होण्याचे स्वप्न पतीला आयपीएसची वर्दी घालून पूर्ण केल्याचे म्हटले जात आहे.

    या सोशल मीडिया पोस्टवरुन गदारोळ झाल्यानंतर कृष्णा या सोशल मीडियावरुन गायब झाल्या आहेत. बिहार लोकसेवा आयोगाच्य परीक्षेत कृष्णा या महिलांमध्ये टॉपर होत्या. पाटण्यातील कंकडबाग येथे त्या राहत होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी सुनीलकुमार हे आयपीएस राहत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आयपीएस बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली होती. परंतु, त्यांना यश मिळाले नव्हते. अखेर बीपीएससी परीक्षेत त्यांना यश मिळाले. त्या आता पोलीस अधीक्षक म्हणून सेवेत रुजू आहेत.

    डीवायएपींच्या पतीसोबतच्या फोटोबाबतची तक्रार काही जणांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे केली. कृष्णा यांनी त्यांचे पती हे आयपीएस असून, पंतप्रधान कार्यालयात नियुक्तीस असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने बिहारच्या पोलीस मुख्यालयाकडे विचारणा केली. त्यानंतर कृष्णा यांची चौकशी सुरू झाली.

    Wearing IPS uniform to husband costly for female DYSP, complaint reaches directly to PM’s office

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!