विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातल्या 140 कोटी जनतेसाठी नव्हे तर आपल्या 22 उद्योगपती मित्रांसाठी सरकार चालवतात. त्यातही अदानी + अंबानींसाठी ते विशेष प्रेमाने काम करतात, असा आरोप राहुल गांधींनी सातत्याने चालवला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरीकडून जोरदार तडाखा हाणला आहे. Wealth creation must be respected in India, says PM Modi
आज तकला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी, असले आरोप तर नेहरू सरकारवर पण व्हायचे. नेहरू सरकारला लोक टाटा + बिर्लांचे सरकार म्हणायचे, याची आठवण करून दिली. मोदी म्हणाले, पण माझे मत असे की या देशात संपत्ती निर्मात्यांचा सन्मान झालाच पाहिजे. या देशात श्रमिकांचा सन्मान झाला पाहिजे आणि संपत्ती निर्माण करणाऱ्यांचाही सन्मानच झाला पाहिजे, हे मी लाल किल्ल्यावरून बोललो आहे आणि आजही त्या मतावर ठाम आहे. माझ्या देशातल्या उद्योगपतींच्याही मल्टी नॅशनल कंपन्या हव्यात. त्यांची दुकाने आंतरराष्ट्रीय बाजारात हवीत. जगातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये हवीत. पण जर कोणी बेईमानी करून संपत्ती मिळवत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई देखील हवी. बेईमानाला फासावर लटकवा!!
माझ्यावर आरोप करणारा गांधी परिवार मानसिक समस्येने ग्रस्त आहे. मोदी तिसऱ्यांदा जिंकून पंतप्रधान झाले, तर ते पंडित नेहरूंची बरोबरी करतील. इंदिरा गांधींची बरोबरी करतील आणि नेहरू + इंदिरा गांधींची प्रतिष्ठा कमी होईल, याची भीती गांधी परिवाराला वाटते. त्यातून ते माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करत राहतात, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी हाणला.
पंतप्रधान मोदी देशातल्या शेतकऱ्यांच्या खिशातून पैसा काढून घेऊन तो मोठ्या उद्योगपतींना देतात. ते देशातल्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करत नाहीत, पण मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ करतात, असा आरोप सातत्याने राहुल गांधी आणि बाकीच्या विरोधकांनी चालविल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी थेट अदानी + अंबानी मुद्द्यावर पंडित नेहरूंचे आणि टाटा + बिर्ला यांची नावे घेऊन उत्तर दिल्याने काँग्रेसची गोची झाली आहे.
Wealth creation must be respected in India, says PM Modi
महत्वाच्या बातम्या
- मान्सूनचे शुभवर्तमान : IMDचा अंदाज 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचेल, महाराष्ट्रात 9 ते 16 जूनदरम्यान आगमन
- संघाचं फडकं म्हणून उद्धव ठाकरेंकडून भगव्या ध्वजाजा अपमान!!
- स्वाती मालीवाल यांच्या जबानीनंतर दिल्ली पोलिसांमध्ये FIR दाखल; त्यात बिभव कुमारचे नाव, पण केजरीवाल अद्याप गप्प!!
- मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री आलमगीरला धक्का; कोर्टाने EDला सहा दिवसांची दिली रिमांड