• Download App
    Yogi Adityanath दंगेखोरांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवू

    Yogi Adityanath : दंगेखोरांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवू, बरेली हिंसाचारावर योगी आदित्यनाथ यांचा संताप

    Yogi Adityanath

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : Yogi Adityanath दंगेखोरांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील असा धडा शिकवू असा इशारा देत बरेली हिंसाचारावर योगी आदित्यनाथ यांनी संताप व्यक्त केला आहे.Yogi Adityanath

    उत्तर प्रदेशातील बरेली येथे “I Love Muhammad” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिंसाचारावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ‘एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट मौलाना तौकीर रझा यांच्यावर निशाणा साधला.Yogi Adityanath

    मुख्यमंत्री म्हणाले, “बरेलीमध्ये एक मौलाना विसरले की सत्तेत कोण आहे. त्याने नाकेबंदीचा इशारा दिला होता. आम्ही स्पष्ट केले आहे की ना नाकेबंदी होईल, ना कर्फ्यू लागेल. अशा लोकांना असा धडा शिकवला जाईल की त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही दंगल करण्याचा विचार करणे शक्य होणार नाही.”Yogi Adityanath



    या वक्तव्याच्या काही तासांनंतरच इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (IMC) चे प्रमुख मौलाना तौकीर रझा यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांना घरात नजरकैदेत ठेवल्यानंतर पहाटे ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर सकाळी सहा वाजता न्यायालयात हजर करण्यात आले आणि नंतर सुरक्षा कारणास्तव त्यांना सिटापूर कारागृहात हलवण्यात आले.

    दरम्यान, शुक्रवारी नमाजानंतर मौलाना रझा यांच्या आवाहनावर मोठ्या संख्येने जमाव जमला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली असूनही आंदोलक इस्लामिया मैदानाकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. “अल्लाहू अकबर”च्या घोषणांसह आंदोलकांनी दुकाने, वाहने आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली. खलील स्कूल चौकाजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्हिडिओंमध्ये शेकडो लोक पळ काढताना दिसले, तर घटनास्थळी चपला, बूट आणि पोस्टर्स विखुरलेले होते.

    पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 40 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे 2,000 अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगलखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही आणि सोशल मीडियावरचे व्हिडिओ तपासले जात आहेत.

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले की 2017 नंतर त्यांच्या सरकारने कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे. “उत्तर प्रदेश आता शांतता, सुरक्षा आणि गुंतवणुकीचे केंद्र म्हणून पुढे जात आहे. दंगलखोरांना मोकळे रान देण्याचा काळ संपला आहे”, असे ते म्हणाले.

    We will teach a lesson that seven generations of rioters will remember, Yogi Adityanath’s anger over Bareilly violence

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RBI : RBIचे नवे नियम, बँकांना 15 दिवसांत दावे निकाली काढावे लागतील, अन्यथा मृतांच्या वारसांना भरपाई

    Amit shah : अमित शहा म्हणाले- ही घुसखोरांना हाकलून लावणारी निवडणूक, लालू अँड कंपनीने बिहारला लुटले

    Pakistan Defence Minister : मुनीर यांच्या निलंबनाच्या प्रश्नावर अडखळले पाक संरक्षणमंत्री; देश लष्कर चालवते की सरकार विचारल्यावर म्हणाले- हायब्रिड मॉडेलद्वारे चालवले जाते