• Download App
    उत्तर प्रदेशातून पहिला आला दावा; भाजप ३०० जागा जिंकेल; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे वक्तव्य; निवडणूक तयारीत भाजपची आघाडी।We will see a historic victory in 2022 with over 300 seats: UP Deputy CM Keshav Prasad Maurya

    उत्तर प्रदेशातून पहिला आला दावा; भाजप ३०० जागा जिंकेल; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे वक्तव्य; निवडणूक तयारीत भाजपची आघाडी

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूकीला काही महिने बाकी उरले असताना राज्यातून पहिला राजकीय दावा आज करण्यात आला आहे. राज्यात भाजप ३०० जागा जिंकेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले आहे. We will see a historic victory in 2022 with over 300 seats: UP Deputy CM Keshav Prasad Maurya

    भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष सध्या उत्तर प्रदेशाच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर आहेत. पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थिती आणि करोना हाताळणीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी आढावा बैठका सुरू केल्या आहेत. योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वैयक्तिक भेटी घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मौर्य यांनी विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकण्याचे वक्तव्य केले आहे. निवडणूकीच्या पूर्व तयारीत भाजपने समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस यांच्यावर एक प्रकारे आघाडी घेतली आहे.



    संतोष यांनी सोमवारी काही मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या. आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग, वैद्यकीय शिक्षण आणि अर्थमंत्री सुरेश खन्ना आणि कायदेमंत्री ब्रिजेश पाठक यांच्यासह सात मंत्र्यांशी त्यांनी वैयक्तिक भेटी घेऊन चर्चा केली. उत्तर प्रदेशातील करोना परिस्थिती हाताळण्यावरून सरकारविरोधात बोलणाऱ्यांपैकी पाठक हे भाजपातील पहिले मंत्री होते. आज मंगळवारी संतोष हे उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत.

    राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचीही चर्चा सुरू आहे. अशात बी. एल. संतोष हे लखनौत आल्याने मंत्रिमंडळात मोठे फेरबद्दल करून नेमकी कोणाला संधी मिळणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.

    We will see a historic victory in 2022 with over 300 seats: UP Deputy CM Keshav Prasad Maurya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!