• Download App
    पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील, तर आम्ही त्यांच्या हातात बांगड्या भरू; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!! We will make Pakistan wear bangles pm calls opposition

    पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील, तर आम्ही त्यांच्या हातात बांगड्या भरू; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!!

    विशेष प्रतिनिधी

    मुजफ्फरनगर : आत्तापर्यंत पाकिस्तानात पीठ नाही. वीज नाही हे माहिती होते, पण त्यांच्याकडे हातात भरायला बांगड्या नाहीत, हे  माहिती नव्हते, पण हरकत नाही, आम्ही जाऊन पाकिस्तानच्या हातात बांगड्या भरू, अशा बोचऱ्या शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान आणि काँग्रेसची जबरदस्त खिल्ली उडवली.  We will make Pakistan wear bangles pm calls opposition

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या मुजफ्फरपूर येथे जाहीर सभा घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुजफ्फरपूरमधील एनडीएच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि इंडी आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अलीकडेच पाकिस्तानबाबत केलेल्या शरणागत वक्तव्याचा समाचार घेतला. भारताने पाकिस्तानशी सुसंवाद राखावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो, अशी भीती मणिशंकर अय्यर यांनी दाखवली होती.

    त्यांच्या या भीतीवरच नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केला. मोदी म्हणाले, हे काँग्रेसवाले खूप घाबरलेले आहेत. हे लोक इतके घाबरले की यांना रात्री स्वप्नातही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसतो. काँग्रेसच्या नेत्यांना रात्री झोपेतही पाकिस्तानचा अणूबॉम्ब दिसत राहतो. हा देश अशा लोकांच्या ताब्यात देऊन कसं चालेल? हे काँग्रेसवाले आणि इंडी आघाडीतील नेते हल्ली ज्या प्रकारची वक्तव्ये करत आहेत, ती वक्तव्ये पाहून हसू येते. तसेच हे किती भित्रे आहेत ते समजतं. हे काँग्रेसवाले पाकिस्तानला किती घाबरलेले आहेत ते त्यांच्या बोलण्यातून दिसते.

    मोदी म्हणाले, ते काँग्रेसवाले म्हणताहेत की, पाकिस्तानने काय बांगड्या भरलेल्या नाहीत, नसतील भरल्या तर मग आम्ही जाऊन त्यांच्या हातात बांगड्या भरू. आता पाकिस्तानला पीठ हवं आहे. त्यांच्याकडे वीज नाही, हे आम्हाला माहिती होतं. परंतु, पाकिस्तानकडे बांगड्या देखील नाहीत हे माहिती नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या हातात बांगड्या भरू!!

    पंतप्रधान म्हणाले, काहीजण मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला क्लीनचिट देत आहेत. तर, तेच लोक आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्य सर्जिकल स्ट्राइकवर किंवा एअर स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत आहेत. हे लोक भारताची आण्विक शस्त्रास्रे संपवण्याचा डाव रचत आहेत. कधी कधी असं वाटतं की या काँग्रेस आणि इंडी आघाडीवाल्या लोकांनी भारताविरोधात मोर्चा काढला आहे. त्यांनी कोणाकडून तरी भारताची सुपारी घेतली आहे. असे हे स्वार्थी लोक राष्ट्ररक्षेसाठी कठोर निर्णय घेऊ शकतात का?? अशा संघटना, ज्यांचं काही अस्तित्वच नाही ते भारताला मजबूत बनवू शकतात का? हे लोक भारताला मजबूत नव्हे तर मजबूर करतील.

    We will make Pakistan wear bangles pm calls opposition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!