शिंदे यांनी सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांचीही भेट घेतली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी अभिनेता सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. अलीकडेच सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे त्याला भेटायला गेले होते.we will Finish Lawrence Bishnoi Eknath Shindes statement after meeting Salman Khan
मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच अभिनेत्याच्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. सलमान खान त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेर आला आणि त्यांना घरात घेऊन गेला, जिथे शिंदे यांनी सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान, राजकारणी बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झीशान यांची भेट घेतली.
भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “मी सलमान खानला सांगितले आहे की सरकार तुमच्या पाठीशी आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली जाईल. आम्ही प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचू. कोणालाही सोडले जाणार नाही. अशाप्रकारे कोणालाही लक्ष्य केले जाऊ नये.”
याशिवाय त्यांनी म्हटले की, कोणत्याही गँग किंवा गँगवारला परवानगी नाही दिली जाणार, आम्ही असं होऊ देणार नाही. आम्ही बिश्नोईला संपवू”
we will Finish Lawrence Bishnoi Eknath Shindes statement after meeting Salman Khan
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्यात सर्व पक्षकारांना ऑगस्टपर्यंत दिली मुदत!
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ECI ची कारवाई, 43 दिवसांत कोट्यवधींची रोकड जप्त
- ‘ काहीही झाले तरी मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही’, अमित शाहांची इंफाळमध्ये घोषणा!
- बारामतीत कुठल्याही पवारांचा पराभव झाला, तर असे कोणते आकाश कोसळणार आहे??