विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरच्या विशेष दर्जासाठी यापुढेही संघर्ष सुरूच ठेऊ. मात्र, या केंद्रशासित प्रदेशात जेव्हा निवडणुका होतील तेव्हा आपला पक्ष त्या लढवेल, अशी घोषणा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुला यांनी केली. We will contest election – faraq abdulla
ते म्हणाले, की जम्मू आणि काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स वचनबद्ध आहे. जम्मू-काश्मिरमध्ये निवडणुका कधी होणार, हे माहीत नाही. मात्र, त्या जेव्हा होतील तेंव्हा आमचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, हे स्पष्ट आहे.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० रद्द करत राज्याची दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केली होती. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याविषयी ते म्हणाले, की तालिबानला आता देशा चालवायचा आहे. ते मानवाधिकारांचा आदर करेल तसेच इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करेल, अशी आशा आहे.
We will contest election – faraq abdulla
महत्त्वाच्या बातम्या