• Download App
    अंबानी, अदानी यांची पूजा करायला हवी, कारण तेच देशात रोजगार देता, भाजप खासदाराचा अजब तर्क|We should worship Ambani and Adani, because they are the ones who provide employment in the country, strange argument of BJP MP

    अंबानी, अदानी यांची पूजा करायला हवी, कारण तेच देशात रोजगार देता, भाजप खासदाराचा अजब तर्क

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रिलायन्स असो, अंबानी किंवा अदानी आणि इतरांची पूजा केली पाहिजे. त्यांचा सन्मान करायला हवा. कारण ते या देशातील लोकांना रोजगार देत आहेत, असा अजब तर्क भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री के.जे. अल्फोन्स यांनी मांडला आहे.We should worship Ambani and Adani, because they are the ones who provide employment in the country, strange argument of BJP MP

    अर्थसंकल्पीय चर्चेत बोलताना अल्फोन्स म्हणाले, तुम्ही माझ्याावर भांडवलदारांचे प्रवक्ते असण्याचा आरोप करु शकता. कोणताही व्यक्ती या देशात रोजगार निर्माण करतो, ते मग रिलायन्स असो, अंबानी, अदानी असो किंवा आणखीन कोणी असो त्यांची पूजा करायला हवी. कारण ते रोजगार देतात.



    अलफोन्स म्हणाले, आपण रोजगार निर्माण करित नाही. जे पैसे गुंतवणूक करतात.. अंबानी, अदानी तो प्रत्येक व्यावसायिक जो पैसे गुंतवणूक करतात ते रोजगार निर्माण करतात. मी कधीही अंबानींबरोबर कॉफी घेतलेली नाही. पण देशातील प्रत्येक प्रामाणिक माणूस जो रोजगार निर्माण करतात,

    त्यांचा सन्मान करायला हवा. त्याची चर्चा व्हायला हवी.बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या सात वर्षांमध्ये गरिबांसाठी खर्च केला आहे. सरकारने विकास योजना, दवाखाने आणि आरोग्य सुविधांचे निर्माण केले आहे. यातून रोजगाराची संधी निर्माण करते.

    We should worship Ambani and Adani, because they are the ones who provide employment in the country, strange argument of BJP MP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे