• Download App
    Baloch Army 'आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे',

    Baloch Army :’आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे’, बलुच आर्मीचा मोठा दावा

    Baloch Army

    या दाव्याने शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांची झोप उडाली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Baloch Army बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. बलुचिस्तानच्या कलाट विभागात स्थित सुरब शहरावर ताबा मिळवल्याचा दावा बलुच आर्मीने केला आहे.Baloch Army

    द बलुचिस्तान पोस्टच्या बातमीनुसार, बलुच आर्मीच्या सदस्यांनी सुरब शहरातील बँक, पोलिस स्टेशन आणि इतर सरकारी प्रतिष्ठानांवर ताबा मिळवला आहे. बलुच लिबरेशन आर्मी म्हणजेच बीएलएने असेही म्हटले आहे की या संदर्भात लवकरच मीडियाला सविस्तर माहिती दिली जाईल.



    बलुचिस्तान बऱ्याच काळापासून स्वातंत्र्याची मागणी करत आहे. बलुच अमेरिकन काँग्रेसचे सरचिटणीस रज्जाक बलुच यांनीही भारत आणि अमेरिकेला बलुच स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. आता बलुच आर्मीच्या या दाव्याने शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांची झोप उडवली आहे. बलुचिस्तान पोस्टने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की शेकडो सशस्त्र बीएलए सैनिकांनी सुरब शहरावर हल्ला केला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना शरण येण्यास भाग पाडले. यादरम्यान अनेक सरकारी वाहनांना आग लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

    We have captured Pakistan’s Surab city Baloch Armys big claim

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

    Toxic Cough Syrup : 2 राज्यांत कफ सिरपमुळे 23 मुलांचा मृत्यू; 5 राज्यांमध्ये कोल्ड्रिफ सिरपवर बंदी, सीबीआय चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत टाइप-7 बंगला अलॉट; नवा पत्ता- 95 लोधी इस्टेट; खासदाराच्या घरी राहत होते