• Download App
    "अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेऊ शकत नाही..." सीतारामन विरोधकांवर भडकल्या!We cannot name every state in the budget Nirmala Sitharaman gets angry on allegations of ignoring the states

    “अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेऊ शकत नाही…” सीतारामन विरोधकांवर भडकल्या!

    राज्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावर निर्मला सीतारामन यांनी दिलं प्रत्युत्तर!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विरोधकांवर राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तर सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि कोणत्याही राज्याकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सांगितले. We cannot name every state in the budget Nirmala Sitharaman gets angry on allegations of ignoring the states


    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत हलवा सेरेमनी; केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 ची तयारी पूर्ण


    अर्थसंकल्पीय भाषणात कोणत्याही राज्याचे नाव घेतले नसेल तर याचा अर्थ या राज्यांना काहीही मिळाले नाही असं होतं नाही. अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी विरोधकांना सुनावलं. यानंतरही सरकारने सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने अनेक राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला.

    विरोधकांच्या आरोपांवर टीका करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, “काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत राहिली आणि या काळात त्यांनी अनेक अर्थसंकल्प सादर केले. त्यांना माहीत आहे की, अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान प्रत्येक राज्याचे नाव घेणे शक्य नाही. अर्थसंकल्प मी महाराष्ट्राचे नाव घेतले नाही, केवळ उदाहरण म्हणून सांगितलं गेलं. पण तेथील एका प्रोजेक्टसाठी 76 हजार रुपयांची घोषणा केली आहे, तर या राज्याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे मानले जाईल का? असा सवाल सीतारामन यांनी केला.

    We cannot name every state in the budget Nirmala Sitharaman gets angry on allegations of ignoring the states

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार