• Download App
    कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केली, इतर राज्ये मात्र अपयशी, योगी आदित्यनाथ यांची टीका|We bottled up the ghost of Corona, but other states failed, criticized Yogi Adityanath

    कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केली, इतर राज्ये मात्र अपयशी, योगी आदित्यनाथ यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : देशातील इतर राज्ये कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली असली तरी उत्तर प्रदेशात मात्र कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केले असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.We bottled up the ghost of Corona, but other states failed, criticized Yogi Adityanath

    कुशीनगर येथे सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केलेले असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीने जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे



    उत्तर प्रदेशात कोरोनाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील ४० जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

    त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील बहुतांश भागांत कोरोना नियमावलीत शिथिलता देण्यात आली आहे.योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना समाजवादी पक्षावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, पूर्वी अब्बाजान म्हणणारे सर्वजण गरीबांचे रेशन हडपायचे.

    कुशीनगरचे रेशन तेव्हा थेट नेपाळ, बांगलादेश पर्यंत पोहोचत होतो. मात्र, २०१७ नंतर त्याला रोखण्यात आले आहे. मोदींच्या राज्यात तृष्टीकरणाला स्थान नाही. त्यामुळे गरीबांचा हक्क हिरावून घेतला जात नाही.

    We bottled up the ghost of Corona, but other states failed, criticized Yogi Adityanath

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले