विशेष प्रतिनिधी
लखनऊ : देशातील इतर राज्ये कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली असली तरी उत्तर प्रदेशात मात्र कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. कोरोनाच्या भुताला आम्ही बाटलीत बंद केले असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.We bottled up the ghost of Corona, but other states failed, criticized Yogi Adityanath
कुशीनगर येथे सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकले आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केलेले असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीने जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचे काम केले आहे
- योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची रक्तपिपासू राक्षसाची तुलना, माजी राज्यपालांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
उत्तर प्रदेशात कोरोनाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळाले आहे. उत्तर प्रदेशातील ४० जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.
त्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील बहुतांश भागांत कोरोना नियमावलीत शिथिलता देण्यात आली आहे.योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना समाजवादी पक्षावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, पूर्वी अब्बाजान म्हणणारे सर्वजण गरीबांचे रेशन हडपायचे.
कुशीनगरचे रेशन तेव्हा थेट नेपाळ, बांगलादेश पर्यंत पोहोचत होतो. मात्र, २०१७ नंतर त्याला रोखण्यात आले आहे. मोदींच्या राज्यात तृष्टीकरणाला स्थान नाही. त्यामुळे गरीबांचा हक्क हिरावून घेतला जात नाही.
We bottled up the ghost of Corona, but other states failed, criticized Yogi Adityanath
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी
- भुकबळीच्या दिशेने जात असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेच्या भावनेतून मदत, अमेरिका देणार ४७१ कोटी
- देशात आठवड्यात एक विश्वविद्यालय सुरु, गेल्या सात वर्षातील चित्र; केंद्र सरकारचे शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याचा परिणाम
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणात भारताचा नवा उच्चांक! ७५ कोटींपर्यंत मारली मजल; WHO कडून अभिनंदन