वृत्तसंस्था
मुंबई : क्रिप्टो करन्सी एक्सचेंज वझीर-एक्स चालवणाऱ्या झान्माई लॅबच्या संचालकांकडे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने झाडाझडती घेतली. या कारवाईत कंपनीचे 64.67 कोटी रुपयांचे बँक बॅलन्स गोठविले आहे. Wazir-X cryptocurrency exchange freezes Rs 64.67 crore
वझीर-एक्स हे एक क्रिप्टो करन्सी एक्सचेंज असून याचा वापर भारतात क्रिप्टो व्यवहारांसाठी अनेकजण करतात, हे वापरणे इतर एक्सचेंजच्या तुलनेत अधिक सोपे असल्याने ते खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे वझीर एक्स हे भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बनले आहे. पीअर टू पीअर क्रिप्टो व्यवहार यावरून करता येतात. म्हणजेच, यावरून बिटकॉइन, इथरियम, रिपल, ट्रॉन, लाइटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करता येते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या कथित उल्लंघनाच्या आरोपाखाली वझीर एक्सशी संबंधित 2 प्रकरणांची ईडी चौकशी करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवसातच वझीर एक्सवर ईडीने कारवाई केली आहे.
2,790 कोटींचे मनी लॉड्रिंग
वजीर एक्सच्या माध्यमातून सुमारे 2,790 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंगची चौकशी ईडी करत आहे. राज्यसभेत ही माहिती देण्यात आली आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले की, ईडी क्रिप्टोकरन्सीशी संबंधित दोन प्रकरणांची या क्रिप्टो एक्स्चेंजविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) अंतर्गत चौकशी करत आहे.
Wazir-X cryptocurrency exchange freezes Rs 64.67 crore
महत्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, बांठिया अहवालातील त्रुटी दूर करण्याची मागणी
- मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थांचा ७०० किलोचा साठा
- जस्टिस उदय यू. लळीत होणार देशाचे ४९ वे सरन्यायाधीश, २७ ऑगस्टला शपथविधी, ८ नोव्हेंबरपर्यंत कार्यकाळ
- जुन्याच वॉर्ड रचनेनुसार निवडणूक; महाविकास आघाडीसह काँग्रेसमध्ये फूट पाडायला कारणीभूत!!