• Download App
    WATCH : इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचे झाले दोन भाग, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ|WATCH Two parts of plane crashed during emergency landing, heartbreaking video

    WATCH : इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचे झाले दोन भाग, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

    सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून युजर्सचे डोळे पाणावतात. विमान अपघात आणि विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मालवाहू विमान विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करताना दिसत आहे.WATCH Two parts of plane crashed during emergency landing, heartbreaking video


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून युजर्सचे डोळे पाणावतात. विमान अपघात आणि विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मालवाहू विमान विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करताना दिसत आहे.

    विमानाचे लँडिंग इतके भयंकर आहे की ते पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये डीएचएल कंपनीचे विमान विमानतळाच्या धावपट्टीवर घसरताना आणि आपत्कालीन लँडिंगच्या वेळी त्याचे दोन तुकडे झाल्याचे दिसत आहे.



    हा व्हिडिओ जुआन सांतामारिया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे, जिथे डीएचएलचे बोईंग 757-200 मालवाहू विमान आपत्कालीन लँडिंग दरम्यान क्रॅश झाले. DHL चे हे बोईंग ग्वाटेमालाला जात होते, पण हायड्रोलिक्स सिस्टीममध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

    अशा प्रकारे विमानाचे दोन भाग होणे सामान्य नाही. या विमान अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे डीएचएल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे, ही दिलासादायक बाब आहे. त्याचबरोबर DHL कंपनीने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

    WATCH Two parts of plane crashed during emergency landing, heartbreaking video

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स