युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. पुतिन म्हणाले की, युक्रेनच्या सैन्याने आपले शस्त्र खाली ठेवावे. यानंतर युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोट होत असल्याच्या बातम्या येत आहेत. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश देत, रशियाचा त्यावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले. Watch Russia Ukraine War Russian tanks enter Ukraine, several cities, including the capital Kiev, hit by ballistic missiles, Putin threatens
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले आहेत. पुतिन म्हणाले की, युक्रेनच्या सैन्याने आपले शस्त्र खाली ठेवावे. यानंतर युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोट होत असल्याच्या बातम्या येत आहेत. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश देत, रशियाचा त्यावर कब्जा करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगितले. पण जर बाहेरून धोका असेल तर त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिले जाईल. यासोबतच रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ सुमारे २ लाख सैनिक तैनात केले आहेत. इकडे युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे अनेक आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेसा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहे.
पुतिन म्हणाले – युक्रेनवर कब्जा केलेला नाही
पुतिन म्हणाले की, जो कोणी आमच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा आमच्या लोकांना धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्याने हे जाणून घेतले पाहिजे की रशियाची प्रतिक्रिया तत्काळ असेल आणि ते तुम्हाला तुमच्या इतिहासात पाहिलेले परिणामांकडे घेऊन जाईल. जे यापूर्वी कधीही अनुभवले नाही. ते पुढे म्हणाले की, युक्रेनमधील आमच्या योजना (विशेष लष्करी कारवाईच्या) मध्ये युक्रेनच्या भूभागाचा ताबा समाविष्ट नाही. युक्रेनने दिलेल्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून ही कारवाई करण्यात येत असल्याचे पुतीन यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितले. युक्रेनचे “सरकार” रक्तपातास जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. पुतिन यांनी इतर देशांना चेतावणी दिली की, रशियन कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलेला नाही असे परिणाम होतील.”
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री म्हणाले – आम्ही जिंकू
इकडे रशियाच्या लष्करी कारवाईनंतर युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. ते म्हणाले की, रशियाने आमच्यावर हल्ला केला आहे. ते पुढे म्हणाले की, युक्रेनमधील शांतताप्रिय शहरांमध्ये हल्ले केले जात आहेत. हे युद्धाच्या दिशेने एक पाऊल आहे. यातून युक्रेन आपला बचाव करेल आणि विजय मिळवेल. यासोबतच ते पुढे म्हणाले की, जगाने पुढे येऊन पुतीन यांना रोखले पाहिजे. आता कारवाईची वेळ आली आहे.
युक्रेनमध्ये देशव्यापी आणीबाणी
तत्पूर्वी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर युक्रेनने बुधवारी देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली. दरम्यान, पाश्चात्य देशांनी रशियाविरुद्ध अनेक निर्बंधांची घोषणा केली आणि मॉस्कोने युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. युक्रेनच्या खासदारांनी राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या देशव्यापी आणीबाणी लागू करण्याच्या आदेशाला मान्यता दिली आहे जी गुरुवारपासून 30 दिवस चालेल.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे रशियाला भावनिक आवाहन
येथे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी टीव्हीवर थेट येऊन रशियाला लष्करी आदेश देण्यापूर्वी सीमेवर सतत वाढत असलेल्या तणावाच्या दरम्यान युद्ध टाळण्याचे उत्कट आवाहन केले. त्यांनी रशियन लोकांना रशिया-युक्रेनच्या सामायिक इतिहासाची आणि संस्कृतीची आठवण करून दिली. झेलेन्स्की म्हणाले की, त्यांनी व्लादिमीर पुतिन यांनादेखील कॉल केला होता, परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या देशाला शांतता हवी आहे.
Watch Russia Ukraine War Russian tanks enter Ukraine, several cities, including the capital Kiev, hit by ballistic missiles, Putin threatens
महत्त्वाच्या बातम्या
- Russia – Ukraine war : युक्रेनच्या 13 शहरांवर रशियाचा हल्ला; प्रतिकाराची युक्रेनची तयारी!!; भारताचे संयमाचे आवाहन
- स्वाभिमानाचे वीज मागणीचे आंदोलन पेटले; शेतकऱ्यांनी पेटविले महावितरणचे कार्यालय
- Nawab Malik ED : आजचे आक्रमक ठाकरे – पवार हे नवाब मलिकांची पाठराखण कुठपर्यंत करू शकतील…??
- युक्रेनमध्ये पाच स्फोट; नागरी विमानतळ बंद