Ravindra Jadeja made history : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात जडेजाने कोणत्याही गोलंदाजाच्या एका षटकात सर्वात जास्त धावा काढणारा भारतीय फलंदाज बनला आहे. WATCH Ravindra Jadeja made history, scoring 37 runs in one over in IPL in CSK Vs RCB match
क्रीडा प्रतिनिधी
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इतिहास रचला आहे. आयपीएलच्या इतिहासात जडेजा आता कोणत्याही गोलंदाजाच्या एका षटकात सर्वात जास्त धावा काढणारा भारतीय फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम विदेशी फलंदाजच्या नावे होता. यापूर्वी आयपीएलच्या 2011 मधील हंगामात युनिव्हर्सल बॉस क्रिस गेलने प्रशांत परमेश्वरनच्या एका षटकात 37 धावा कुटल्या होत्या.
जडेजाने आयपीएल 2021 मध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या हर्षल पटेलच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर पुढच्या चेंडूवरही षटकार ठोकला. यानंतर पटेलने पुढचा बॉल नोबॉल टाकला. यावरही जडेजाने उंच षटकार खेचला. अशा प्रकारे पहिल्या दोन चेंडूंतच पटेलने 19 धावा दिल्या.
यानंतर तिसऱ्या चेंडूवरही जडेजाने षटकार ठोकला. मग चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. यानंतर पांचव्या चेंडूवर सिक्स आणि अखरेच्या चेंडूवर चार धावा काढल्या. अशा प्रकारे जडेजाने एका षटकात 37 धावा वसूल केल्या.
जडेजाने केवळ 28 चेंडूंमध्ये नाबाद 62 धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 192 धांवाचे लक्ष्य मिळाले. जडेजाने आपल्या फलंदाजीदरम्यान पाच षटकार आणि चार चौकार लगावले. याशिवाय फाफ डू प्लेसिसने 41 चेंडूंत 50 धावा, सुरेश रैनाने 18 चेंडूंत 24 धावा आणि ऋतुराज गायकवाडने 25 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या बळावर 33 धावा काढल्या.
WATCH Ravindra Jadeja made history, scoring 37 runs in one over in IPL in CSK Vs RCB match
महत्त्वाच्या बातम्या
- भारत- फ्रान्सच्या नौदलाचा आजपासून संयुक्त युद्धाभ्यास, अरबी समुद्रात तीन दिवस कवायत
- वाह योगीजी वाह! : शासकीय रुग्णालयात बेड नसेल तर खासगीत घ्या उपचार, सरकार देणार खर्च
- केंद्राची आणखी एक मोठी मदत, BPCL रिफायनरीजवळ जम्बो कोविड सेंटरला तातडीची मान्यता, विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठाही करणार
- Vaccination : कॉंग्रेसशासित 3 राज्यांचा 1 मेपासून लसीकरणास नकार, लसीच्या तुटवड्याचे दिले कारण
- महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा, प्रत्येक नागरिकाला मोफत मिळणार कोरोनाची लस