• Download App
    WATCH : १२६ वर्षीय स्वामी शिवानंदांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदीही झाले नतमस्तक, योगासाठी मिळाला पद्मश्री पुरस्कार, व्हिडिओ व्हायरल|WATCH: Prime Minister Modi bows down in honor of 126-year-old Swami Sivananda, receives Padma Shri award for yoga, video goes viral

    WATCH : १२६ वर्षीय स्वामी शिवानंदांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदीही झाले नतमस्तक, योगासाठी मिळाला पद्मश्री पुरस्कार, व्हिडिओ व्हायरल

    राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी 128 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणी पोहोचले.WATCH: Prime Minister Modi bows down in honor of 126-year-old Swami Sivananda, receives Padma Shri award for yoga, video goes viral


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी 128 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. वाराणसीचे 126 वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी अनवाणी पोहोचले.

    पद्म पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी पंतप्रधान मोदींना वाकून नमस्कार केला. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी गुडघे टेकून पंतप्रधान मोदींना अभिवादन केले. शिवानंद यांचे हे भाव पाहून पीएम मोदीही आपल्या खुर्चीवरून उठले आणि शिवानंदांसमोर नतमस्तक झाले.



    पंतप्रधान मोदींना अभिवादन केल्यानंतर स्वामी शिवानंद यांनी पद्म पुरस्कार प्राप्त करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर गुडघे टेकले. स्वामी शिवानंदांना आपल्यासमोर नतमस्तक झालेले पाहून राष्ट्रपती कोविंद पुढे आले आणि त्यांनी त्यांना वाकून उठवले.

    वयाने एवढे ज्येष्ठ असूनही स्वामी शिवानंद किती विनम्र आहेत हे दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक विविध कॉमेंट करत आहेत. व्हिडिओ पोस्ट करताना एका IAS अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘१२६ वर्षीय योगगुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्याची घोषणा. योगासाठी आपले प्राण अर्पण करणारे स्वामी शिवानंद हे आपल्या नम्र व्यक्तिमत्त्वाने सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. योगाची उत्पत्ती जिथून झाली, आम्ही तेथून आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.”

    126 वर्षांचे आहेत स्वामी शिवानंद

    स्वामी शिवानंद यांना भारतीय जीवनपद्धती आणि योग क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या १२६व्या वर्षीही स्वामी शिवानंद किशोरवयीन मुलासारखे तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. स्वामी शिवानंद यांचे जीवन चमत्कारापेक्षा कमी नाही. स्वामी शिवानंद यांच्या पासपोर्टनुसार त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी झाला होता.

    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण 128 जणांचा समावेश आहे. यापैकी चार जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

    WATCH: Prime Minister Modi bows down in honor of 126-year-old Swami Sivananda, receives Padma Shri award for yoga, video goes viral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र