प्रतिनिधी
बंगळुरू : ऑटोमोबाईल कंपनी टेस्ला आणि मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क हे कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांची भारतात अधिक चर्चा होत आहे. केवळ चर्चाच नाही तर एलन मस्क यांची साग्रसंगीत पूजाही करण्यात आली आहे. लोक अगरबत्ती, धूप घेऊन एलन मस्क यांच्या फोटोपुढे आरती करत आहेत.WATCH People of Bangalore worship Elon Musk, video of world’s richest man’s aarti goes viral
भारतातील टेक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये हे सर्व घडत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक लोकांनी एलन मस्क यांची पूजा का सुरू केली? चला जाणून घेऊया…
प्रथम जाणून घ्या ही पूजा कोण करत आहे?
वास्तविक, सेव्ह इंडियन फॅमिली फेडरेशन (SIFF) तर्फे एलन मस्क यांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. बंगळुरू येथील फ्रीडम पार्क येथे टेस्लाच्या सीईओंसाठी या विशेष ‘पूजेचे’ आयोजन करण्यात आले होते.
का केली जात आहे पूजा?
सेव्ह इंडियन फॅमिली फेडरेशन (एसआयएफएफ) ही पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारी एनजीओ आहे. एलन मस्क यांच्या पूजेबाबत या संस्थेचे म्हणणे आहे की, SIFFच्या पुरुष कार्यकर्त्यांना कंपनीच्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेकदा ट्विटरवरून बंदी घातली होती. ज्यांनी पुरुषांच्या हक्कासाठी आवाज उठवला, त्यांचे अकाउंट सर्वप्रथम ट्विटरने बॅन केले. एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्या लोकांचे अकाउंट रिस्टोर केले आणि आता आपल्या सर्वांना भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. म्हणूनच एलन मस्क यांची पूजा केली जात आहे.
व्हिडिओ झाला व्हायरल
एलन मस्क यांची पूजा करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कार्यकर्ते बॅनरसह दिसत आहेत, ज्यावर लिहिलेले आहे की पुरुषांचे जीवन महत्त्वाचे आहे आणि पुरुषांना शांततापूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे. पूजा करणाऱ्यांनी एलन मस्क यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवली आणि एलन मस्काय नमः, एलन मस्क की जय… एलन मस्क जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना, श्रीमन नरसिंग या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, ‘SIFF सदस्य ट्विटर विकत घेण्यासाठी आणि पुरुषांना त्यांच्या छळाच्या विरोधात त्यांचे मत व्यक्त करण्यास परवानगी देण्यासाठी बंगळुरूमध्ये गुरु @elonmusk यांची पूजा करत आहेत.’
WATCH People of Bangalore worship Elon Musk, video of world’s richest man’s aarti goes viral
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे दिल्लीतील मंत्रिपदांचे राजीनामे; पण नवाब मलिकांनी अखेरपर्यंत दिला नव्हता राजीनामा!!
- मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाची फटकार; हायकोर्टात जायचे सोडून थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात??
- सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज