• Download App
    WATCH : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, डीएपी खताची बॅग आता २४०० ऐवजी १२०० रुपयांना, खत सबसिडीत उच्चांकी वाढ । Watch Modi Government Historic Pro Farmers Decision, Now Farmers Will Get DAP Fertilizer Bag At Rs 1200

    WATCH : मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, डीएपी खताची बॅग आता २४०० ऐवजी १२०० रुपयांना

    DAP Fertilizer Bag : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज खतांच्या दराच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक असिड, अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किमतींमुळे खतांचे दर वाढत असल्याची बैठकीत चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय दर वाढले असूनही जुन्या दराने शेतकर्‍यांना खत मिळायला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. डीएपी खतासाठी प्रत्येक बॅगमागे सबसिडी 500 रुपये, 140% वाढवून 1200 रुपये करण्याचा ऐतिहासक निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे डीएपीच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावांमध्ये वाढ झाली असली, तरी ती केवळ 1200 रुपयांच्या जुन्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारनेही दरवाढीचा संपूर्ण अधिभार सहन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति बॅग सबसिडीची रक्कम यापूर्वीही कधीही एकाचवेळी एवढी वाढवण्यात आली नव्हती. नुकतीच डीएपीमध्ये वापरल्या जाणार्‍या फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया इत्यादींच्या आंतरराष्ट्रीय किंमती 60% ते 70% पर्यंत वाढल्या आहेत. या कारणास्तव डीएपी बॅगची वास्तविक किंमत आता 2400 रुपये आहे, ज्या खत कंपन्या 500 रुपयांच्या अनुदानावर 1900 रुपयांना विकत आहेत. परंतु आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फक्त 1200 रुपयांमध्ये डीएपी बॅग मिळणे सुरू राहील. Watch Modi Government Historic Pro Farmers Decision, Now Farmers Will Get DAP Fertilizer Bag At Rs 1200

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र