• Download App
    WATCH : केजरीवालांनी स्वत:चे गुरू अण्णा हजारेंची रुग्णालयात हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, कपिल मिश्रा यांचा खळबळजनक आरोप|WATCH Kejriwal tried to kill his guru Anna Hazare in the hospital, Kapil Mishra's sensational allegation

    WATCH : केजरीवालांनी स्वत:चे गुरू अण्णा हजारेंची रुग्णालयात हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, कपिल मिश्रा यांचा खळबळजनक आरोप

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या मद्य घोटाळ्यातील चौकशीमुळे चांगलेच अडचणीत आलेले आहेत. आता दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा यांचा केजरीवाल यांच्यावरील आरोपांचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे. कपिल मिश्रा यांनी या व्हिडिओतून नमकहराम केजरीवाल यांनी स्वत:चे गुरू अण्णा हजारे यांचा रुग्णालयात मारण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोपही केला आहे.WATCH Kejriwal tried to kill his guru Anna Hazare in the hospital, Kapil Mishra’s sensational allegation

    हा व्हिडिओ दाखवू नये यासाठी केजरीवाल विविध वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना आणि मालकांना फोन करत असल्याचेही मिश्रा यांनी म्हटले आहे. मिश्रा म्हणतात की, या व्हिडिओमुळे केजरीवाल यांना काय अडचण आहे, ही तर नमकहरामीची कहाणी आहे….



    कपिल मिश्रा व्हिडिओची सुरुवात एका नमकहरामची कहाणी या वाक्याने करतात. व्हिडिओत त्यांनी केजरीवाल यांनी आजवर सांगितलेले खोटे, जनतेची केलेली दिशाभूल, एवढेच नव्हे तर खुद्द अण्णा हजारे यांची फसवणूक आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न असे गंभीर आरोप केले आहेत. कपिल मिश्रा म्हणतात की, केजरीवाल कधीही इन्कम टॅक्स अधिकारी नव्हते, त्यांनी धादांत खोटे सांगितले, बनावट पणे त्यांनी एक एनजीओही चालवली. केजरीवाल आधी स्वत: पक्ष काढणार नाही, निवडणूक लढवणार नाही असे सांगायचे, पण त्यांनी पक्षही काढला निवडणूकही लढवली. यानंतर म्हणायचे की, कधीही बंगला-गाडी घेणार नाही. पण त्यांनी तेही केले. आता ते मद्य घोटाळ्यात पुरते अडकले आहेत. त्यांचे दोन खंदे साथीदार तुरुंगात आहेत. आता तेही तुरुंगात जातील. जेलवारी टाळण्यासाठी केजरीवाल यांची तडफड सुरू असल्याचेही मिश्रा यांनी म्हटले आहे. पाहा कपिल मिश्रा यांचा व्हायरल झालेला हा संपूर्ण व्हिडिओ….

    WATCH Kejriwal tried to kill his guru Anna Hazare in the hospital, Kapil Mishra’s sensational allegation

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही