kejriwal Govenments : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश त्रस्त आहे. कोरोना प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या काही राज्यांपैकी नवी दिल्लीही आहे. देशाची राष्ट्रीय राजधानीलाही इतर राज्यांप्रमाणेच बेड्स, ऑक्सिजन व औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. परंतु येथील केजरीवाल सरकारने आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी केवळ जाहिरातबाजीवर जनतेचा पैसा उधळल्याचे एका आरटीआयमधून समोर आले आहे. दिल्लीमध्ये कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. यादरम्यान गत महिन्यात एका आरटीआयमुळे केजरीवाल सरकारने केलेल्या वायफळ खर्चाचा खुलासा झाला. या आरटीआयनुसार अरविंद केजरीवाल सरकारने यावर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत विविध माध्यमांतून जाहिरातींवर 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. त्यांचा एकूण सात वर्षांचा सत्ताकाळ पाहता केजरीवाल सरकारने एकाही नव्या हॉस्पिटलची उभारणी न करता निव्वळ जाहिरातींवर तब्बल 864 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे. WATCH kejriwal Govenments Shocking Expendiure On Advt, Not A Single Hospital Build Since 7 years Rule
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील कोरोना स्थितीमुळे पंतप्रधान मोदींचा ब्रिटन दौरा रद्द, G7 देशांमध्ये होणार आहे बैठक
- उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ITI ची इमारत, गृहमंत्री शहांनीही घेतला परिस्थितीचा आढावा
- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची कोरोनावर मात, एम्समधून पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी
- वादग्रस्त सचिन वाझे अखेर पोलीस सेवेतून बडतर्फ; अँटिलिया केस, मनसुख हिरेन मृत्यू खटल्यात आरोपी
- मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट, आतापर्यंत काय घडलं? वाचा सविस्तर..