Former CM Kamal Nath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला आहे. एका व्हिडिओमध्ये कमलनाथ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला इंडियन स्ट्रेन म्हटले आहे. शनिवारी याबाबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूची खिल्ली उडवताना दिसत आहे. भारतातील कोरोना संसर्गातील वाढीबाबत बोलताना त्यांनी तो भारतीय स्ट्रेन असल्याचे म्हटले आहे. WATCH Former CM Kamal Nath Saying Indian Corona Triggers Controversy
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला आहे. एका व्हिडिओमध्ये कमलनाथ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला इंडियन स्ट्रेन म्हटले आहे. शनिवारी याबाबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूची खिल्ली उडवताना दिसत आहे. भारतातील कोरोना संसर्गातील वाढीबाबत बोलताना त्यांनी तो भारतीय स्ट्रेन असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले कमलनाथ?
कमलनाथ व्हिडिओत म्हणाले की, “जानेवारी 2020 ला सुरुवात झाली तेव्हा आपण म्हणायचो की चीनचा कोरोना, चीनची महामारी. पण आता आपण कुठे पोहोचलो आहे. ब्रिटनचे पंतप्रधान म्हणतात की, इंडियन कोरोनामुळे भीती आहे, त्यांच्या सर्व फ्लाइट बंद करा. आज जे विद्यार्थी आणि जे तेथे नोकरी करायचे त्यांची एंट्री बंद केली आहे, कारण ते इंडियन कोरोन घेऊन येतील. आज मेरा भारत महान तर राहूच द्या, आज मेरा भारत कोविड बनला आहे. यात किती दाबले, लपवले तरी आपण स्वत:ला धोका देऊ शकत नाही.”
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी असा दावा केला की, कोरोनाच्या दुसर्या लाटेला जगात भारतीय कोरोनाचे रूप म्हणतात. शनिवारी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यामध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यावर बोलताना दिसत आहेत.
आता केवळ कोरोनाच्या उद्रेकामुळे भारताला ओळखले जात असल्याचे त्यांनी म्हटले. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या व्हिडिओवर टीका करत संबित पात्रा म्हणाले की, “सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाचे नेते देशाची बदनामी करण्यात आनंद मानत आहेत. ते असेही म्हणाले आहे की, त्यांनी चीनशी जणू काही सामंजस्य करार केला आहे. याचाच परिणाम या व्हिडिओत दिसत आहे. या लोकांना भारताला बदनाम करण्यात एक विचित्र आनंद मिळतो.”
WATCH Former CM Kamal Nath Saying Indian Corona Triggers Controversy
महत्त्वाच्या बातम्या
- तिबेटवर चीनची श्वेतपत्रिका : दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याला चिनी सरकारची मान्यता बंधनकारक
- ड्रॅगनची खेळी : अरुणाचल प्रदेश, भूतान आणि नेपाळच्या सीमेजवळील गावांचा विकास करत असल्याचा चीनचा दावा
- ब्रिटनच्या तरुण पिढीला राजेशाही संपुष्टात आणण्याची इच्छा, सर्वेक्षणातून स्पष्ट कल
- पाकिस्तानात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीदरम्यान स्फोट, ७ जण ठार; १३ जखमी
- जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात दुप्पट असल्याची WHO ची भीती; १८ नव्हे, ३० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता