• Download App
    WATCH : देशातील सर्व 15% मुस्लिम मते काँग्रेसला मिळाली तरी ते जिंकतील कसे? हिंदूंची मने जिंकणे गरजेचे- रफीकुल इस्लाम|WATCH: Even if Congress gets all 15% Muslim votes in the country, how will it win? It is necessary to win the hearts of Hindus - Rafiqul Islam

    WATCH : देशातील सर्व 15% मुस्लिम मते काँग्रेसला मिळाली तरी ते जिंकतील कसे? हिंदूंची मने जिंकणे गरजेचे- रफीकुल इस्लाम

    वृत्तसंस्था

    गुवाहाटी : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. आतापर्यंत विविध वक्तव्यांनी ही निवडणूक गाजली आहे. यादरम्यान आसामच्या एआययूडीएफ पक्षाचे सरचिटणीस रफिकुल इस्लाम यांनी काँग्रेसला आरसा दाखवला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना रफिकुल यांनी काँग्रेस मुस्लिमांचे लांगुलचालन करत असल्याबद्दल टीका केली आहे.WATCH: Even if Congress gets all 15% Muslim votes in the country, how will it win? It is necessary to win the hearts of Hindus – Rafiqul Islam



    रफिकुल इस्लाम म्हणतात, “काँग्रेसचे काय झाले आहे ते देवालाच माहीत. हिंदूंचे ध्रुवीकरण करून भाजप जिंकत आहे. ज्या देशात 85% हिंदू आहेत, त्यांना एकत्र आणण्यासाठी भाजप रात्रंदिवस काम करत आहे आणि दुसरीकडे, काँग्रेस 15% मुस्लिमांना वेगळे करण्याचे काम करत आहे. यामुळे काय साध्य होणार आहे? समजा भारतातील अख्ख्या मुस्लिम लोकसंख्येनेही काँग्रेसला मतदान केले, तरीही यामुळे पक्षाला काय फायदा होणार आहे? खरं तर काँग्रेसने हिंदू पट्ट्यात जायला पाहिजे, त्यांच्या समस्या ऐकून त्यांची मने जिंकायला हवी होती…. सर्व हिंदू मते भाजपकडे जात आहेत, मग 15% मुस्लिमांची मते काँग्रेसला कशी मदत करणार?

    खरं तर काँग्रेसवर नेहमीच तुष्टीकरणाचे आरोप होत आले आहेत. नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले गौरव वल्लभ यांनीही काँग्रेसींसारख्या सनातनला शिव्या देऊ शकत नाही म्हणत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. रफिकुल इस्लाम यांनी काँग्रेसची दशा आणि दिशा यावर दिलेली प्रतिक्रिया समाजमाध्यमांवरही चर्चिली जात आहे.

    WATCH: Even if Congress gets all 15% Muslim votes in the country, how will it win? It is necessary to win the hearts of Hindus – Rafiqul Islam

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’