प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेन आर्मीच्या काही सैनिकांनी आरआरआर चित्रपटातील ऑस्कर विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. युक्रेनच्या मायकोलायव शहरात याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. लिबरल डेमोक्रॅटिक लीग ऑफ युक्रेन (LDLU) चे उपाध्यक्ष जान फेडोटोव्हा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. नंतर तो RRR चित्रपटाच्या अधिकृत खात्यावरदेखील शेअर केला गेला.WATCH Dance of Ukrainian soldiers on Natu-Natu song, mocking Russia
व्हिडिओमध्ये काय…
या विडंबन व्हिडिओमध्ये युक्रेन आर्मीनी क्रिएटिव्ह अडॉप्शन केलेले दिसते. त्यांनी त्याचा उपयोग एंटरटेनिंग ट्रिब्यूट देण्यासाठी केला आहे. व्हिडीओमध्ये लष्कराचे जवान रामचरण आणि ज्युनियर एनटीआरप्रमाणेच स्टेप्स करताना दिसत आहेत. हे गाणे RRR चित्रपटात या दोघांवर चित्रित करण्यात आले होते.
व्हिडिओमध्ये कोणता संदेश
चित्रपटाच्या मूळ गाण्यात मुख्य अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर ब्रिटिश अधिकाऱ्यांचा विरोध करताना दिसले. युक्रेन आर्मीच्या सैनिकांनी या गाण्याच्या माध्यमातून रशियाचा निषेध व्यक्त केला आहे.
‘नाटू नाटू’ हे गाणे का निवडले?
RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावरील डान्सचे चित्रीकरण युक्रेनमधील राष्ट्रपती भवनात करण्यात आले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी राजामौली यांच्या टीमने येथे एक गाणे शूट केले होते. राजामौली यांनी यासाठी युक्रेन सरकारची विशेष परवानगी घेतली होती.
या गाण्याने जिंकला ऑस्कर
‘नाटू-नाटू’ या गाण्याला यंदाचा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर प्रकारात देण्यात आला. हे गाणे प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक एमएम किरवानी यांनी संगीतबद्ध केले आहे.
WATCH Dance of Ukrainian soldiers on Natu-Natu song, mocking Russia
महत्वाच्या बातम्या
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले – मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार, कधी होणार हे मुख्यमंत्री ठरवतील
- 4 दिवस उशिराने केरळमध्ये येणार मान्सून, महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा, मध्यप्रदेशसह 6 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर
- ”देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं”, राज ठाकरेंचं विधान!
- राष्ट्रवादीची आली पंचविशी, मुख्यमंत्री राहू द्या, मनातला पक्षाध्यक्ष नेमण्यात पवार होणार का यशस्वी??