प्रतिनिधी
नवी दिल्ली : सीबीआयने नुकतीच गुजरातमधील राजकोट येथे डीजीएफटीचे डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेडचे संयुक्त अधिकारी जावरी मल बिश्नोई यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली होती.WATCH: Bag full of money thrown from roof to escape from CBI, entire incident captured on CCTV
शनिवारी सीबीआयचे पथक राजकोटमधील त्यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकण्यासाठी गेले असता त्याने सीबीआय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि चौथ्या मजल्यावरच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली होती.
या प्रकरणात आता सीबीआयने छापे टाकून घर आणि कार्यालयातून एक कोटी रुपये जप्त केले आहेत. जेव्हा सीबीआयचे पथक घरी पोहोचले, तेव्हा अधिकाऱ्याच्या पत्नीने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले आणि टेरेसवरून रोख भरलेली बॅग पार्किंगमध्ये फेकून दिली, जी तिच्या पुतण्याने उचलली आणि शेजारच्या घरात रोख रक्कम असलेली एक बॅग पाठवली.
छतावरून पैसे फेकल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीबीआयने दोन्ही बॅगमधून सुमारे एक कोटी रुपये जप्त केले असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
WATCH: Bag full of money thrown from roof to escape from CBI, entire incident captured on CCTV
महत्वाच्या बातम्या
- खलिस्तानी समर्थकांची सरकारला धमकी, प्रगती मैदानात लावणार झेंडा, अमेरिकेतील भारतीय दूतावासावर निदर्शने; पत्रकाराला मारहाण
- राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईलमध्ये लिहिले ‘अपात्र खासदार’; प्रियांकांचा राजघाटावरून हल्लाबोल
- “एकतर इम्रान खान यांची हत्या होईल किंवा…” पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांचे खळबळजनक विधान!
- 8 वर्षीय मंगोलियन मुलगा होणार तिबेटचा तिसरा धर्मगुरू, दलाई लामा यांनी पूर्ण केले धार्मिक विधी