• Download App
    WATCH : रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडेल, आमदार असल्याची लाज वाटतेय, उद्विग्न आप आमदाराचे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचे आवाहन । Watch AAP MLA Shoib IQbal Demands President Rule In Delhi Amid Corona Crisis

    WATCH : रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडेल, आमदार असल्याची लाज वाटतेय, उद्विग्न आप आमदाराचे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचे आवाहन

    President Rule In Delhi : आम आदमी पक्षाच्या आमदाराने दिल्लीतील कोरोनाच्या ढासळत्या परिस्थितीसंदर्भात आपल्याच पक्षावर अविश्वास दाखवला आहे. मटिया महालचे आम आदमी पक्षाचे आमदार शोएब इक्बाल म्हणतात की, कोरोनाने दिल्लीत अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली आहे. दिल्लीत कोणतेही काम चालू नाही. दिल्लीत कोणीही ऐकणारा नाही. ते म्हणाले की, बेड नाही, ऑक्सिजन नाही, औषधे उपलब्ध नाहीत. इथे कोणतीही कामे होत नाहीत. अशा परिस्थितीत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जावी. Watch AAP MLA Shoib IQbal Demands President Rule In Delhi Amid Corona Crisis


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या आमदाराने दिल्लीतील कोरोनाच्या ढासळत्या परिस्थितीसंदर्भात आपल्याच पक्षावर अविश्वास दाखवला आहे. मटिया महालचे आम आदमी पक्षाचे आमदार शोएब इक्बाल म्हणतात की, कोरोनाने दिल्लीत अत्यंत वाईट परिस्थिती ओढवली आहे. दिल्लीत कोणतेही काम चालू नाही. दिल्लीत कोणीही ऐकणारा नाही. ते म्हणाले की, बेड नाही, ऑक्सिजन नाही, औषधे उपलब्ध नाहीत. इथे कोणतीही कामे होत नाहीत. अशा परिस्थितीत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जावी.

    मी सर्वात सीनियर आमदार, कोणीही ऐकेना

    आपचे आमदार शोएब इक्बाल म्हणाले की, सरकार फक्त दिल्लीत कागदावर चालत आहे. ते म्हणाले की, मी सहा वेळा आमदार झालेलो आहे. मी सर्वात वरिष्ठ आमदार आहे. येथे कोणीही ऐकणारा नाही, नोडल ऑफिसर नाही. ते म्हणाले की अशा परिस्थितीत तत्काळ प्रभावीपणे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू केली जावी.

    कॉंग्रेस आणि भाजपनेही लक्ष्य केले

    आपच्या आमदाराच्या वतीने राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून भाजप आणि कॉंग्रेसनेही राष्ट्रपती राजवटीला पाठिंबा दर्शविला आहे. शोएब इक्बाल बरोबर असल्याचे भाजप नेते म्हणाले. दिल्लीतील परिस्थिती अरविंद केजरीवाल यांच्या हाताबाहेर गेली आहे. यापूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनीही दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.

    दिल्लीत दररोज 24 हजारांहून अधिक रुग्ण

    गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत कोरोनाचे नवे 24,235 रुग्ण आढळले, याचबरोबर दिल्लीतील एकूण बाधितांची संख्या 11,22,286 वर गेली. शहरात संसर्ग होण्याचा दर 32.82 टक्के झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्लीत 395 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, गतवर्षी साथीच्या आजाराची सुरुवात झाल्यानंतर काल दिवसभरात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत शहरातील 15,772 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

    Watch AAP MLA Shoib IQbal Demands President Rule In Delhi Amid Corona Crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती