शिया वक्फ बोर्ड यूपीचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उपाख्य जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना हरिद्वार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उत्तराखंड-उत्तर प्रदेशच्या नरसन सीमेवरून चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केली. वसीम रिझवी यांना शहर पोलिसांत आणून तासभर चौकशी करण्यात आली.Wasim Rizvi alias Jitendra Narayan Tyagi arrested in Haridwar in Dharma sansad provocative statement Case
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शिया वक्फ बोर्ड यूपीचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उपाख्य जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना हरिद्वार पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी उत्तराखंड-उत्तर प्रदेशच्या नरसन सीमेवरून चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केली. वसीम रिझवी यांना शहर पोलिसांत आणून तासभर चौकशी करण्यात आली.
वमीम रिझवी ऊर्फ जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी 12 नोव्हेंबर रोजी हरिद्वार प्रेस क्लबमध्ये त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. कार्यक्रमात वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांनी एका विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केले होते. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच वेळी 17 डिसेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत, उत्तर हरिद्वारच्या खारखरी येथे असलेल्या वेद निकेतनमध्ये धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातही वसीम रिझवी यांनी प्रक्षोभक भाषण केले होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ज्वालापूर येथील रहिवासी गुलबहार खान यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी वसीम रिझवी यांना नोटीसही बजावली होती. गुरुवारी उशिरा हरिद्वार पोलिसांनी वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना नरसन सीमा येथून अटक केली. पोलिसांनी वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायणसिंग त्यागी यांना अटक करून हरिद्वारला आणले.
एसपी सिटी स्वतंत्र कुमार सिंग, सीओ सिटी शेखर सुयाल यांनी वसीम रिझवी यांची बंद खोलीत अनेक तास चौकशी केली. यानंतर वसीम रिझवी यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आले. डीआयजी गढवाल करण सिंह नागन्याल यांनी सांगितले की, वसीम रिझवी यांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
वसीम रिझवी ऊर्फ जितेंद्र नारायण सिंह त्यागी, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि गाझियाबादच्या डासना येथील देवी मंदिराचे महंत स्वामी नरसिंहानंद गिरी हेही त्यांच्यासोबत होते. प्रक्षोभक भाषण प्रकरणात स्वामी नरसिंहानंद गिरी यांचेही नाव आहे. मात्र पोलिसांनी वसीम रिझवी यांनाच अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीम रिझवी आणि स्वामी नरसिंहानंद गिरी हे एकाच वाहनातून हरिद्वारहून निघाले होते. डीआयजी गढवाल करण सिंह नागन्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी नरसिंहानंद गिरी यांना कायदेशीर कारणांमुळे अटक करण्यात आलेली नाही.
Wasim Rizvi alias Jitendra Narayan Tyagi arrested in Haridwar in Dharma sansad provocative statement Case
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुंबई बँक शिवसेना-राष्ट्रवादीच्या ताब्यात, प्रवीण दरेकरांना धक्का देत अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, प्रसाद लाड यांचा पराभव
- PM-CM Meeting : कोरोना हरणार, भारत जिंकणार, बैठकीत पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांमध्ये भरला जोश, आर्थिक बाबींवर परिणाम होऊ न देण्याचे निर्देश
- “नाय वरण-भात लोंचा कोन नाय कोंचा” ट्रेलर तसेच चित्रपटावर बंदीची भारतीय स्त्री शक्ती संघटनेची मागणी
- Punjab Election 2022 : ‘आप’कडून टेली व्होटिंग सुरू, मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा निवडण्यावर जनतेकडून अभिप्राय