Waseem Rizvi prints The Real Quran : उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वसीम रिझवींनी स्वतः नवीन कुराण प्रकाशित केले आहे. या कुराणात बरेच बदल केले आहेत. त्यांनी कुराणात नोंदवलेल्या 26 आयती काढून टाकल्या आहेत. या 26 आयती वसीम रिझवींच्या मते दहशतवादाला चालना देणाऱ्या होत्या. Waseem Rizvi prints The Real Quran; omits 26 verses from it
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वसीम रिझवींनी स्वतः नवीन कुराण प्रकाशित केले आहे. या कुराणात बरेच बदल केले आहेत. त्यांनी कुराणात नोंदवलेल्या 26 आयती काढून टाकल्या आहेत. या 26 आयती वसीम रिझवींच्या मते दहशतवादाला चालना देणाऱ्या होत्या.
वसीम रिझवी यांनी नवीन कुराणाचे पहिले प्रत अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष (एआयएमपीबीएल) मौलाना राबे हसानी नदवी यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधानांना लिहिले पत्र
यापूर्वी वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांनी नवीन कुराण लिहिले आहे. त्यांनी लिहिले की कुराणच्या त्या आयतींमधून अत्याचार, धार्मिक उन्माद पसरविणार्या गोष्टींचा उल्लेख आहे, म्हणून जुन्यावर बंदी घालावी. यासह सर्व मदरशांमध्ये आणि मुस्लिम समाजात नवीन कुराण शिकवण्याची व्यवस्था सुनिश्चित करण्याची मागणी त्यांनी केली.
वसीम यांनी म्हटले होते की, मी कुराणचा अभ्यास केला. असे आढळले की, कुराण-ए-मजीदमध्ये 26 आयती अशा आहेत, ज्या अल्लाहचे विधान असू शकत नाहीत. या आयती दहशतवाद, अतिरेकी आणि कट्टरपंथी मानसिकतेला चालना देतात. यामुळे मुस्लिम समाजात दहशतवादी विचारधारा निर्माण होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला होता 50 हजारांचा दंड
वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 आयती काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 12 एप्रिल रोजी ही याचिका फेटाळून लावताना कोर्टाने रिझवींना 50 हजार रुपये दंड ठोठावला होता.
असा होता युक्तिवाद…
सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत वसीम रिझवी म्हणाले होते की, कुराणातील या आयती मदरशांमधील मुलांना शिकवल्या जात आहेत, त्यामुळे त्यांचे मन कट्टरपंथाकडे जात आहे. याचिकेमध्ये असे म्हटले गेले होते की, कुराणच्या या 26 आयतींमध्ये हिंसाचार शिकविला गेला आहे. दहशतवादाला चालना देणारे असे कोणतेही शिक्षण थांबवले पाहिजे. या वचनांचा नंतरच्या काळात कुराणात समावेश करण्यात आला आहे, असेही रिझवी म्हणतात. देशहितासाठी कोर्टाने या आयाती काढून टाकण्याचे आदेश दिले पाहिजेत, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.
रिझवींना प्रचंड विरोध
वसीम रिझवी यांच्या याचिकेला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. मुस्लिम समाजातील अनेक नेते चिडले होते. तसेच रिझवींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. वसीम रिझवी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल करण्यात आले होते. एवढेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला होता.
Waseem Rizvi prints The Real Quran; omits 26 verses from it
महत्त्वाच्या बातम्या
- Twitter Action : केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचा ट्विटरला इशारा, फ्री स्पीचच्या नावाखाली कायद्यापासून वाचू शकणार नाही
- ट्विटरवर कायद्याचा बडगा : गाझियाबाद पोलिसांकडून ट्विटरसह 9 जणांविरुद्ध FIR; घटनेला धार्मिक रंग दिल्याचा आरोप
- उत्तर प्रदेशात बसपचे ११ आमदार फुटताच मायावतींना जाग;मुलायम सिंगांच्या समाजवादी पक्षावर टीकेची झोड
- Tokyo Olympics 2021 : साताऱ्याचा सुपुत्र प्रवीण जाधवची निवड ; भारतासाठी ‘आर्चरी’द्वारे घेणार पदकाचा वेध
- कोल्हापूरात सर्वपक्षीय मराठा आंदोलन सुरू; एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे खासदार संभाजीराजे – चंद्रकांतदादा कोल्हापूरात आंदोलनात एकत्र