विशेष प्रतिनिधी
इंदूर: देशाबाबत आणि विविध धर्मांबाबत एमआयएमचे नेते वारिस पठाण हे सातत्याने वादग्रस्त विधाने करतात म्हणून एका मुस्लिम तरुणाने त्यांना अद्दल घडविली आहे. त्यांच्यामुळे दोन धर्मांत तेढ निर्माण होत असून त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठीच व मनातील राग व्यक्त करण्यासाठी एका तरुणाने इंदूर येथे त्यांना काळे फासले.Waris Pathan was slammed by a Muslim youth for making controversial statements about the country.
सद्दाम हा चहाच्या किटलीचे काळे हाताला लावून आला होता. गर्दीचा फायदा घेत तो पठाण यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांच्या चेहऱ्यावर हाताचे काळे फासले. अटकेनंतर सद्दामची जामिनावर सुटका झाली आहे. येथील दर्ग्यात वारिस पठाण गेले असता तिथे एका तरुणाने त्यांना लक्ष्य केले. पठाण यांच्या चेहऱ्याला काळे फासून हा तरुण पसार झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.
- हिंदूंवर द्वेषपूर्ण भाषणांसाठी गुन्हे दाखल करता तर मुस्लिमांवरही करा, सर्वोच्च न्यायालया याचिका दाखल
मध्य प्रदेशमधील आगामी निवडणुका लढण्यासाठी एमआयएम जोरदार मोचेर्बांधणी करत आहे. त्यासाठीच एमआयएमच्या प्रमुख नेत्यांचे मध्य प्रदेश दौरे वाढले असून वारिस पठाण हेसुद्धा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. इंदूर येथील खरजाना भागात काला खरजाना दर्गा येथे (नाहर शहा वली सरकार की दरगाह ) ते चादर अर्पण करण्यासाठी गेले होते.
यावेळी एका तरुणाने त्यांच्या चेहºयाला काळे फासले व तो पसार झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पठाण हे दग्यार्तून बाहेर येत असतानाच हा प्रकार घडला असून हल्लेखोर तरुणाला पकडण्याचाही प्रयत्न झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून काही तासांतच या तरुणाला अटक केली आहे. आरोपीची ओळख पटल्याची माहिती उपायुक्त संपत उपाध्याय यांनी दिली आहे.
वारिस पठाण यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. एमआयएमवर लोकांचं प्रेम आहे. अनेक ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहेत. लोक स्वागत करत आहेत. अशाचप्रकारे एका लहान मुलाने मला काळे तीट लावले होते. ते मी एका ठिकाणी थांबून पुसले.
तेव्हाचे फोटो व्हायरल करण्यात आले असून यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप पठाण यांनी केला. वारिस पठाण हे मुंबईतील भायखळा येथील एमआयएमचे माजी आमदार आहेत. सीएए/एनआरसी बाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. १५ कोटी मुस्लिम १०० कोटी हिंदूंना भारी पडतील, असे ते म्हणाले होते. त्यावरून मोठे वादळ उठले होते.
Waris Pathan was slammed by a Muslim youth for making controversial statements about the country.
महत्त्वाच्या बातम्या
- समाजवादी पक्षाने कब्रिस्तानच्या सीमा भिंतीसाठी खर्च केला तर आमच्या सरकारने तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांचा विकास केला, योगी
- योगी आदित्यनाथांना काळे झेंडे दाखविणाऱ्या तरुणीला अखिलेश यादवांचे मोठे बक्षीस, थेट विधानसभेची दिली उमेदवारी
- सर्वसामान्य लोकांचे डोके चक्रावून टाकणाऱ्या घोषणा डॉ.नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
- किराणा दुकानातून वाईन विक्री विरोधात ‘रिपाइं’ची निदर्शने दुकानात घुसून ‘बाटली फोडो’ आंदोलन करण्याचा इशारा
- भ्रमनिरास करणारा दिशाहिन अर्थसंकल्प पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची टिका