वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२५ बुधवारी दुपारी लोकसभेत सादर करण्यात आले. तब्बल १२ तास प्रदीर्घ चर्चेनंतर ते मंजूर झाले. सत्ताधारी भाजप व एनडीएच्या २८८ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर विराेधी पक्षांच्या २३२ खासदारांनी विराेधात मतदान केले. सत्ताधाऱ्यांच्या सर्व दुरुस्त्या स्वीकारण्यात आल्या तर विराेधकांच्या फेटाळण्यात आल्या. आता गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. त्यावर चर्चेनंतर मतदान हाेईल.
त्याआधी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सुधारित विधेयकाचे नाव युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट, इफिशिएन्सी अँड डेव्हलपमेंट (अपेक्षित) असेल. वक्फ बाेर्डाकडे लाखाेंची संपत्ती आहे, पण त्याचा गरीब मुस्लिमांसाठी उपयाेग हाेत नाही. जर आम्ही हे विधेयक आणले नसते तर ज्या इमारतीत (संसदेत) आपण बसलाेत त्यावरही वक्फ बाेर्डाने दावा केला असता. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी आक्रमक भाषणात उर्वरित. पान २
महाराष्ट्रात वक्फच्या ३१,७१६ मालमत्ता; मराठवाड्यात सर्वाधिक
देशात वक्फ बोर्डाकडे किती संपत्ती?
वक्फकडे ८.७ हजार मालमत्ता आहेत. किंमत १ लाख २० हजार कोटी रुपये. भारतात सर्वाधिक वक्फ संपत्ती आहे. सेना, रेल्वेनंतर तिसरा सर्वात मोठा भू-स्वामी म्हणजे वक्फ आहे. अल्लाहला समर्पित असते, ती विकूही शकत नाही वक्फचा अर्थ आहे, अल्लाहला स्थायी समर्पण. धार्मिक कामासाठी अल्लाहला अर्पण मालमत्ता वक्फ मालमत्ता असते. ती परत घेता येत नाही, ना विकताही येत नाही. देखरेख मुतव्वली करतात. वक्फ बोर्डाकडे देशातील ९.४ लाख एकर जमीन १९५४ मध्ये वक्फ मालमत्तेच्या देखरेखीसाठी वक्फ ॲक्ट बनला. १९९५ व २०१३ च्या संशोधनानंतर अधिकार वाढवल्याने बोर्डाची जमीन वाढून ९.४ लाख एकर इतकी झाली.
शाह यांनी म्हटले- २०१३ मध्ये ५ तासांत सुधारणा झाली. या वेळी दोन्ही सभागृहांत १६ तासांपासून चर्चा सुरू आहे. पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. विरोधक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत. विधेयकाची पहिली तीन पाने वाचल्यास हे लगेच लक्षात येईल. २०१३ च्या विधेयकाला कॅथोलिक संस्थाही अन्यायपूर्ण म्हणत आहेत. एका सदस्याने म्हटले, हे अल्पसंख्याक स्वीकारणार नाहीत. हा भारत सरकारचा कायदा आहे. स्वीकारावा लागेल. काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई म्हणाले की, एका विशिष्ट समाजाच्या जमिनीवर सरकारची नजर आहे, उद्या दुसऱ्या अल्पसंख्याकांच्या जमिनीवर त्यांची नजर पडेल. सुधारणा अशी हवी की विधेयक शक्तिशाली बनावे. ५ वर्षांपर्यंत इस्लाम मानणाराच वक्फ बनवू शकतो. आधी कुणीही वक्फ बनवू शकत होता. २ महिला वक्फमध्ये असायला हव्यात. हे आधीही होते. हा कायदा महिलांविरुद्ध आहे, असा भ्रम त्यांना निर्माण करायचा आहे.’
बीडच्या कनकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डाने हडपली : शाह
अमित शाह म्हणाले, बीडच्या कनकालेश्वर मंदिराची १२ एकर जागा वक्फ बोर्डाने हडपली. ‘दिव्य मराठी’ला मिळालेल्या माहितीनुसार, १९५१ मध्ये मंदिर ट्रस्टने ५५ एकर जागा घेतली, २०१७ मध्ये १२ एकर विकली, पण या जागेवर वक्फने दावा केला.
वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रात ३१,७१६ मालमत्ता असल्याचे केंद्राने संसदेत सांगितले. मात्र वक्फ बोर्डाच्या संकेतस्थळावर मात्र अजूनही २३,५६६ मालमत्तांचीच नोंद आहे. यात सर्वाधिक मराठवाड्यात १५,८७७ मालमत्ता असून ही जागा २३,१२१.१० हेक्टरवर आहे. यापैकी ६०% जागांवर अतिक्रमण आहे. राज्यातील जागा ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाने ४२ आदेश काढले, पण एकही जागा ताब्यात घेण्यात यश आले नाही. मराठवाड्यामध्ये १०८८ प्रकरणांत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिले. मात्र, ३० जून २००७ पर्यंत फक्त २१ आदेशांची अंमलबजावणी झाली. त्या वेळेस २५० प्रकरणे सुनावणीसाठी होती. तर कलम ५५ अंतर्गत अंमलबजावणीसाठी ४८३ हून अधिक आदेश उपमहानिरीक्षकांकडे पाठवण्यात आले होते. यालाही १८ वर्षे लोटली तरी एकही मालमत्ता बोर्डाकडे परत आली नाही. अनेक मालमत्तांचे बेकायदा हस्तांतर झाले आहे.
Waqf Bill passed in Lok Sabha at 2 am; 60% of the land is encroached, nothing is done despite giving notices
महत्वाच्या बातम्या