• Download App
    कोविशिल्ड व्हॅक्सिनेटेट वर पाहिजे म्हणणाऱ्या जाहिरातीतील सत्य काय आहे?|Wantes covishild vaccinated husband add, what is reality behind this

    कोविशिल्ड व्हॅक्सिनेटेट वर पाहिजे म्हणणाऱ्या जाहिरातीतील सत्य काय आहे?

    आपल्यापैकी अनेक जणांनी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मॅरेज मेट्रोमोनियल साईटवरील एका मुलीने मुलाची अपेक्षा व्यक्त करताना कोविशिल्ड व्हॅक्सिनेटेड म्हणजे कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेला मुलगा पाहिजे असे म्हटले आहे. या जाहिरातीमागील सत्य वेगळेच आहे.Wantes covishild vaccinated husband add, what is reality behind this


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेक जणांनी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मॅरेज मेट्रोमोनियल साईटवरील एका मुलीने मुलाची अपेक्षा व्यक्त करताना कोविशिल्ड व्हॅक्सिनेटेड म्हणजे कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेला मुलगा पाहिजे असे म्हटले आहे. या जाहिरातीमागील सत्य वेगळेच आहे. लग्नासाठी लसीकरणाची अट ठेवली आहे.

    या जाहिरातमध्ये मुलीने लिहिलंय की, तिने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून तिला असा मुलगा पाहिजे ज्याला कोरोनाची कोणतीच लक्षणं नसेल आणि त्याने कोरोनाच्या कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असतील. वृत्तपत्रातील ही जाहीरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.



    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही ही अ‍ॅड ट्विटरवर शेअर केली आहे. तसेच त्यांनी कॅप्शन दिलंय, की लग्नाचं गिफ्ट एक बूस्टर शॉट असेल यात शंका नाही. काय हेच आपल्यासाठी न्यू नॉर्मल असेल?

    ही जाहिरात व्हायरल झाल्यामुळे अनेकांनी ती खरी आहे की खोटी याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. ही जाहिरात गोव्यातील एल्डोना येथील एका व्यक्तीने केलेले ं हार्मलेस अभियान होतं. लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्याने हे अभियान सुरू केलं होतं.

    ही अ‍ॅड फार्मासिस्ट असलेल्या साव्हिओ फिगुएरेडो यांनी तयार केली असून गेल्या आठवड्यात फेसबूकवर शेअर केली होती. त्यांच्या मूळ पोस्टमध्ये जी जाहीरात आहे, त्यामध्ये लग्नाच्या अटीसह लसीकरणाबाबत बरीच माहिती दिली आहे. द फ्यूचर ऑफ मॅट्रिमोनियल्स या नावाखाली त्यांनी ही जाहिरात दिली. तसेच त्यामध्ये त्यांनी एका लसीकरण केंद्राचा फोन नंबर टाकून शेअर केली आहे.

    ही पोस्ट तयार करणारे सेव्हियो फिगुएरेडो म्हणाले की, मी लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही जाहिरात तयार केली आणि फेसबूक पेजवर पोस्ट केली आहे. लोकांना ती खरी वाटली आणि व्हायरल केली. या जाहिरातीनंतर कोलकत्ता, ओडिशा आणि मंगळुरूहून लग्नासाठी फोन आलेत.

    मी ही जाहिरात व्हायरल करण्यासाठी बनवली नव्हती. ती केवळ माझ्याच फ्रेंडलिस्टसाठी होती. मात्र, ही व्हायरल झाल्याचा मला आनंद झाला आहे. जाहिरात वाचून 10 जरी लोकांनी लस घेतली तरी मला चांगलं वाटेल,असे ते म्हणाले.

    Wantes covishild vaccinated husband add, what is reality behind this

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य