• Download App
    ममता बॅनर्जी यांना न्यायालयाचा दिलासा, विधानसभा निवडणूक गुरुवारीच होणार|Voting in Bhawanipur will be in time

    ममता बॅनर्जी यांना न्यायालयाचा दिलासा, विधानसभा निवडणूक गुरुवारीच होणार

     

    कोलकता – कोलकतामधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक नियोजित वेळेनुसार म्हणजे गुरुवारी (ता.३०) घेण्यारचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. ही निवडणूक स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली. या मतदारसंघातून नशीब अजमाविणाऱ्या पश्चििम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या निर्णयाने दिलासा मिळाला आहे.Voting in Bhawanipur will be in time

    निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने यावेळी सांगितले. भवानीपूरमध्ये ठराविक तारखेला पोटनिवडणूक घेण्यासाठी बंगालच्यी मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात घटनात्मक अपरिहार्यता असा शब्दप्रयोग केला आहे.



     

    याला निवडणूक आयोगाने आक्षेप घेत मुख्य सचिव हे जनतेचे सेवक असतात. सत्तेवर कोणत्याही पक्षाचे राज्यप असले तरी घटनात्मक पेच टाळण्यासाठी त्यांनी कायद्यानुसार त्यांचे काम केले पाहिजे, असे स्पष्ट केले होते..

    Voting in Bhawanipur will be in time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य