विशेष प्रतिनिधी
नाशिक : Vote Jihad देशात लोकसभा निवडणुकीत झालेला व्होट जिहाद + जातिवाद यांना तोड काढण्यासाठी समस्त हिंदू समाजाने महाराष्ट्रातील सगळी शहरे, गावे, कॉलनी, सोसायट्या, वाड्या वस्त्यांवर सजग रहो आंदोलन सुरू केले असून कोणत्याही परिस्थितीत आपला मतदानाचा टक्का वाढवायचा निर्धार केला आहे. Vote Jihad
संघ परिवाराच्या तब्बल 65 छोट्या मोठ्या संस्था सजग रहो अभियानात उतरल्या असून मतदारयाद्यांवर ग्राउंड लेव्हलवर काम सुरू आहे. प्रत्येक मतदार घरातून बाहेर मतदान केंद्रावर गेलाच पाहिजे. त्याचे 100 % मतदान झालेच पाहिजे यावर सजग रहो अभियानाचा कटाक्ष राहिला आहे.
कॉलनी आणि सोसायट्यांमध्ये मतदानाविषयी अजिबात उदासीनता राहता कामा नये याविषयी विशेष काळजी घेतली जात आहे.
माझी सोसायटी 100% मतदान करणारी सोसायटी आहे हे अभिमानाने सांगू या. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून प्रत्येक सोसायटीने कृपया पुढील गोष्टी ठरवाव्यात.
1. प्रत्येक घरातील 100 % मतदान व्हावे असा संकल्प करण्याचे आवाहन करून तसे बॅनर/ फ्लेक्स सोसायटीत ठिकठिकाणी लावावेत
2. सोसायटीमधील मतदारांची यादी (excel sheet) प्रत्येक बिल्डिंगच्या प्रतिनिधीला सांगून तयार करून घेणे. यामुळे आपल्या सोसायटीत प्रत्येक बिल्डिंगमध्ये आणि एकूण सोसायटीत किती मतदार आहेत याची यादी आणि पक्का आकडा मिळेल.
North Korea : रशिया-युक्रेन युद्धात सामील होऊ शकतो उत्तर कोरिया; दोन्ही देशांत झाला संरक्षण करार
3. बुधवारी 20 नोव्हेंबरला सकाळी 9.00 वाजेचे आत पूर्ण परिवाराला सोबत घेऊन मतदान करून येणेसाठी सर्व सोसायटी सदस्यांना/ रहिवाश्यांना आवाहन करणे.
4. सोसायटीच्या वतीने मतदान करून आल्यावर फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट (फ्लेक्स) तयार करून लावणे. सगळ्यांनी मतदान झाल्यावर आपआपल्या परिवाराचा फोटो सोसायटी ग्रुप वर टाकणे, स्टेटसला ठेवणे यासाठी आवाहन करणे.
5. सोसायटी मधील किती जणांचे मतदान झाले ते प्रत्येक घरी फोन करून विचारणे. दुपारी 2 वाजता अध्यक्ष, सचिव व कार्यकारणीने सोसायटी ऑफिसला बसुन मतदानाचा आढावा घेणे.
6. ज्यांचे मतदान राहिले आहे त्यांना सतत फोन करुन मतदान करायची विनंती करणे.
7. सोसायटीमधून एकुण किती मतदान आहे (संख्या) आणि किती झाले याची आकडेवारी रात्री सोसायटी ग्रुप वर टाकणे.
8. दिवसभरात कोणी मतदान केले नाही व त्याचे कारण काय त्याचीही यादी ग्रुप वर टाकणे.
अशा प्रकारचे नियोजन मोठे शहरे तसेच छोटी शहरे आणि अगदी गाव स्तरावर सुरू आहे. यातूनच व्होट जिहाद सारख्या अपप्रवृत्तींना झटका बसू शकतो, असा विश्वास संपूर्ण हिंदू समाजात तयार होऊ लागला आहे.
Vote Jihad For 100 % voting Break
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल- उद्धव ठाकरेंनी मतांसाठी लाचारी पत्करली, आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही
- Devendra Fadnavis सुन ले ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तिरंगा लहरायेगा पाकिस्तान पर, फडणवीसांचा घणाघात
- Mahavikas Aghadi महाविकास आघाडीला समर्थनाच्या बदल्यात उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या
- Sharad Pawar : येवल्यातून पवारांचा भुजबळांवर हल्लाबोल; पण पवारांनी नरसिंह रावांपुढं नांगी टाकली, शिवसेना फोडली; भुजबळांकडून पोलखोल!!