अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिस मध्ये झालेल्या खडाजंगी नंतर युरोप मधले राष्ट्रप्रमुख “खुश” होऊन झेलेन्स्की यांना तोंडी पाठिंबा देऊन मोकळे झाले. त्यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इम्युअल मॅक्रोन, ब्रिटनचे पंतप्रधान किथ स्टार्मर, जर्मनीचे ओल्फ शुल्स आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा समावेश होता. या सगळ्या नेत्यांनी झेलेन्स्की यांना “हिरो” बनवत युक्रेनला पाठिंबा व्यक्त केला. युरोपियन युनियनच्या टॉप डिप्लोमॅट कासा कलास यांनी त्यांच्या पुढे जाऊन युक्रेन म्हणजे युरोप. युरोप झेलेन्स्की यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. नव्या मुक्त जगाला नव्या नेतृत्वाची गरज आहे. युरोपने ही गरज पूर्ण केली पाहिजे. (अर्थातच ती अमेरिका पुरवू शकत नाही), असे ट्विटर वर लिहिले. पण या सगळ्या नेत्यांनी झेलेन्स्की आणि युक्रेन यांना तोंडी आणि लेखी पाठिंबा दिला. त्यानंतर झेलेन्स्की ब्रिटनचे पंतप्रधान किथ स्टार्मर यांना लंडनमध्ये भेटले.
पण याच दरम्यान झेलेन्स्की यांनी ट्विट करून युक्रेन अमेरिकेबरोबर खनिज संपत्ती अधिकार करार करायला तयार असल्याची कबुली दिली. युक्रेनला आपल्या देशात चिरस्थायी शांतता हवी आहे. केवळ युद्धविराम करून भागणार नाही, तर युक्रेनला सर्व देशांची आक्रमण करणार नसल्याची गॅरंटी हवी आहे. अमेरिका आमच्या पाठीशी आत्तापर्यंत उभी राहिली. ती यापुढेही उभे राहील, हे युक्रेनच्या जनतेने समजून घेतले पाहिजे, असे लिहिले.
युरोपियन राष्ट्रप्रमुखांनी दिलेला तोंडी पाठिंबा आणि त्यानंतर झेलेन्स्की यांनी केलेले ट्विट यातले between the lines वाचले तर झेलेन्स्की एकट्या युरोपच्या बळावर रशियावर कितपत उड्या मारू शकतील??, याविषयी खुद्द त्यांनाच शंका असल्याचे उघड दिसते. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर खडाजंगी झाल्यानंतर सुद्धा झेलेन्स्की यांनी अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटींचे दरवाजे “बंद” केले नाहीत, तर ते अधिक “उघडून” ठेवले.
झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या खडाजंगीच्या दौऱ्याच्या आधीच ब्रिटनचे पंतप्रधान किथ स्टार्मर डोनाल्ड ट्रम्प यांना त्याच व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिस मध्ये भेटले. त्यावेळी सर्व राजशिष्टाचार पाळून दोन्ही राष्ट्रप्रमुखांची चर्चा झाली, तेव्हा कुठलीही खडाजंगी झाली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या शूर सैनिकांची स्तुती केली. ब्रिटनला कुठल्याच युद्धात अमेरिकेची गरज नाही असे सांगितले, पण त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी किथ स्टार्मर यांना एक खोचक सवाल करून त्यांची दांडी काढली. ब्रिटन किंवा युरोप एकट्याच्या बळावर रशियाशी पंगा घेऊ शकेल का?? किंवा युद्ध रेटू शकेल का??, हा तो सवाल होता. त्या सवालाला किथ स्टार्मर यांनी कुठलेही थेट उत्तर दिले नाही, कारण त्या सवालातली खरी खोच त्यांच्यासारख्या कसलेल्या मुत्सद्याच्या लक्षात आली होती.
या सगळ्याचा अर्थ हाच की,
युक्रेनला “युरोप” म्हणणे निराळे, आणि प्रत्यक्ष युरोपने तुफान पैसा ओतून रशियाशी युद्ध खेळणे निराळे!! या दोन भिन्न गोष्टी आहेत, ज्या अमेरिकन हस्तक्षेपाशिवाय किंवा मदतीशिवाय युरोप आणि युक्रेनला शक्य नाहीत!! सगळ्या युरोपने मिळून युक्रेनच्या बाजूने 140 ते 180 अब्ज डॉलर्स युद्धात ओतले, तर अमेरिकेने 350 अब्ज डॉलर्स युक्रेन मध्ये खर्च केले. अमेरिकेने जाहीर केलेल्या रकमेवर युरोपीय राष्ट्रप्रमुखांनी आक्षेप घेतला, पण अमेरिकेने खर्च केलेली नेमकी रक्कम ते देखील नीटपणे सांगू शकले नाहीत. तरी देखील युक्रेनला युद्धात होरपळावे लागले. रशियाचा निर्णायक पराभव करणे सोडाच युक्रेन वरचे रशियाचे प्रखर हल्ले देखील संपूर्ण युरोप आणि युक्रेनला थांबवता आले नाहीत.
हे वास्तव ओळखूनच झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर खडाजंगी झाल्यानंतर सुद्धा अमेरिकन जनतेचे आभार मानले. त्या देशाने केलेल्या मदतीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि वाटाघाटींचे दरवाजे बंद न करता ते उघडे ठेवले.
Volodymyr Zelenskyy says to thank donald trup
महत्वाच्या बातम्या
- Nagpur एच एस ह्युसंग कंपनीची नागपूरात १७४० कोटींची गुंतवणूक; ४०० युवकांना रोजगार!!
- Manipur : मणिपूरच्या सात जिल्ह्यांतील लोकांनी शस्त्रे, दारूगोळा अन् बंदुका सुरक्षा दलांना सोपवल्या
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- Hazaribagh :महाशिवरात्रीला झारखंडमध्ये दोन गटांत हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीत अनेक जखमी