विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – ज्वालामुखी व पृथ्वी यांचा जवळचा संबंध असून वसुंधरेवरील तापमान स्थिर करण्यात ज्वालामुखींची महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे निदर्शनास आले आहे.गेल्या ४० कोटी वर्षांत पृथ्वी स्थिर होण्याची प्रक्रिया, वातावरण आणि सागर याविषयीचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला.Volcano keeps temp. on earth steady
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक अडथळे आणि खडकांचे विघटन करणाऱ्या रासायनिक हवामान प्रक्रिया यावर अभ्यासात भर दिला आहे. या प्रक्रियेतून मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यांसारखी घटकांची निर्मिती झाली. नद्यांमार्फत हे घटक समुद्राला जाऊन मिळाले. तेथे पाण्यात त्यांचे खनिजात रूपांतर होऊन ‘सीओ२’ (कार्बन डाय ऑक्साईड) तयार झाला.
साऊथम्पटन विद्यापीठ (ब्रिटन), सिडनी विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया), ओटावा विद्यापीठ (अमेरिका) आणि लीड्स विद्यापीठ (ब्रिटन) या विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यास केला आहे. यासंबंधाचा शोध निबंध ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
या यंत्रणेद्वारे वातावरणातील ‘सीओ२’ आणि भूवैज्ञानिक वेळेनुसार वैश्वि्क तापमानाची पातळी नियमित राखण्यास मदत झाली, असे या लेखात नमूद केले आहे.
Volcano keeps temp. on earth steady
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत ४० हजार अफगाण निर्वासित आश्रयाला, अन्य देशांपेक्षा घेतली आघाडी
- मोदी सरकारमध्ये ११ महिला मंत्री, ५० महिला खासदार, १०० पेक्षा अधिक महिला आमदार; राहुल गांधींना सुनावले खडे बोल
- लव जिहाद आणि नार्कोटिक्स जिहादवर टीका करणाऱ्या बिशपविरुद्ध केरळचे डावे सरकार खटला भरणार नाही
- भारतात अडकलेले 2142 अफगाणी विद्यार्थी आहेत आर्थिक अडचणीत , गरीब कुटुंब अफगाणिस्तानमधून पाठवू शकत नाही पैसे