• Download App
    Putin यांनी G 7 च्या तोंडात किती सणसणीत हाणली पाहा; जरा प्रगत नापास देशांचे आकडे वाचा!!

    Putin यांनी G 7 च्या तोंडात किती सणसणीत हाणली पाहा; जरा प्रगत नापास देशांचे आकडे वाचा!!

    Putin

    नाशिक : Putin यांनी G7 च्या तोंडात किती सणसणीत हाणली पाहा; जरा प्रगत नापास देशांचे आकडे वाचा!!, असंच म्हणायची वेळ रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आजच्या जाहीर भाषणामुळे आली. पुतीन यांनी प्रगत G7 देशांच्या तोंडात अशी काही सणसणीत चपराक हाणली की त्या गोऱ्या देशांचे गोरे गाल अधिकच लाल झाले. Vladimir Putin

    रशियन इकॉनॉमिक कौन्सिल मध्ये पुतिन यांचे भाषण झाले. या भाषणामध्ये पुतिन यांनी प्रगत अशा युरोपियन देशांचे आणि अमेरिकेचे अक्षरशः वाभाडे काढले. त्यांनी भली मोठी आकडेवारीच सादर केली. त्यातून या प्रगत देशांच्या डळमळच्या अर्थव्यवस्थेची पुरती पोलखोल झाली.

    एरवी अमेरिका आणि युरोपियन देश स्वतःला फार प्रगत समजतात. संपूर्ण जगाच्या प्रगतीचे मापदंड आपल्याच खिशात आहेत आणि ते मापदंड आपण कसेही वापरून इतर देशांना खाली घालायला लावतो, अशी दर्पोक्ती अमेरिकेचे आणि युरोपियन देशांचे प्रमुख नेते करत असतात.

    पण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी थेट आकडेवारी सादर करून प्रगत देशांच्या तथाकथित प्रगत अर्थव्यवस्थेचे वाभाडे काढले.

    – वाचा आकडेवारी

    व्लादिमीर पुतिन म्हणाले, “…जर तुम्ही गेल्या पाच वर्षांतील जागतिक जीडीपीची गती पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या वार्षिक वाढीपैकी जवळपास अर्धी, म्हणजेच ४९ % वाढ, ब्रिक्स देशांमुळे झाली आहे, तर तथाकथित ‘ग्रुप ऑफ सेव्हन’चे (G7) योगदान अंदाजे फक्त १८ % आहे… क्रयशक्ती म्हणजेच खर्च करण्याची आणि वस्तू विकत घेण्याची शक्ती यावर आधारित जागतिक जीडीपीमध्ये ब्रिक्स देशांचा वाटा तब्बल ४० % आहे, तर G7 चा वाटा २९ % पेक्षा कमी आहे. त्यामुळे ब्रिक्स संघटनेच्या सदस्य देशांनी G7 संघटनेच्या तथाकथित प्रगत देशांना आधीच मागे टाकले आहे, आणि हे २०२० मध्येच घडले होते, परंतु हे अंतर वाढत आहे. हे अंतर ब्रिक्सच्या बाजूने आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

    – अमेरिकेला टोला

    पुतिन यांनी सविस्तर आकडेवारी सांगून अमेरिका आणि युरोपीय देशांना सणसणीत चपराक हाणली. अमेरिकेच्या युद्धखोरीवर पण त्यांनी परखड भाष्य केले. इराणने अण्वस्त्र कार्यक्रम स्थगित केल्यानंतर देखील युद्धखोर देशाने इराण वर हल्ले केले आणि तोच देश इतर युद्धे थांबविल्याचा गमजा मारतोय, असा टोला देखील पुतिन यांनी अमेरिकेला हाणला.

    Vladimir Putin says, “…If you look at the global GDP dynamics of the last five years, you will see that almost half of its annual growth

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Data Localization : वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर पाठवण्यावर बंदी; देशातच रेकॉर्ड साठवले जाईल, दूरसंचार क्षेत्रात परवाना राजवट संपली; आता ऑनलाइन मंजुरी मिळेल

    NCERT : NCERT ने अभ्यासक्रमात 1975-1977 आणीबाणी विभाग समाविष्ट केला; इयत्ता 9वीला शिकवले जाईल; NEP 2020 अंतर्गत अभ्यासक्रमात बदल

    Indian Passport : 1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल; सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल, हरवल्यास किंवा खराब झाल्यास ₹8,500 पर्यंत शुल्क