• Download App
    13 डिसिमल जमिनीवरचा अवैध कब्जा सोडा; नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना विश्वभारती विद्यापीठाची नोटीस Visva Bharati University in an eviction order has asked Nobel laureate Amartya Sen to vacate the 13 decimals of land

    13 डिसिमल जमिनीवरचा अवैध कब्जा सोडा; नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांना विश्वभारती विद्यापीठाची नोटीस

    वृत्तसंस्था

    कोलकाता : नोबेल पारितोषिक विजेता अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना प्रख्यात विश्वभारती विद्यापीठाने त्यांच्याकडे असलेल्या 13 डिसिमल जमिनीवरचा अवैध कब्जा सोडायला सांगितले आहे या संदर्भात त्यांना विद्यापीठांनी नोटीस पाठवली असून 6 मे 2023 पर्यंत 13 डिसेंबर जमिनीवरचा अवैध कब्जा सोडून ती जमीन विद्यापीठाच्या ताब्यात देण्यात संदर्भातली ही सूचना आहे. अमर्त्य सेन सध्या परदेशात असून ते जून मध्ये भारतात येणार आहेत. Visva Bharati University in an eviction order has asked Nobel laureate Amartya Sen to vacate the 13 decimals of land

    1921 मध्ये महाकवी रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठात अमर्त्य सेन यांच्या वडिलांना 1.25 एकर जमीन विद्यापीठाने भाडेपट्ट्याने दिली होती. परंतु सध्या अमर्त्य सेन यांच्याकडे 1.38 एकर एवढी जमीन ताब्यात आहे. 1.25 एकर जमिनीवर विद्यापीठ हक्क सांगत नाही. पण उरलेल्या 13 डिसिमल म्हणजे, अमर्त्य सेन यांची निवासस्थान असलेल्या “प्रचिती” या बंगल्याच्या उत्तर पश्चिम दिशेची 50 × 111 चौरस फूट एवढी जमीन अवैधरित्या कब्जा केली आहे, ती 13 डिसिमल एवढी भरते. ती जमीन विद्यापीठाला परत करण्याची नोटीस विद्यापीठाने अमर्त्य सेन यांना दिली आहे.

    मात्र अमर्त्य सेन यांचा संपूर्ण जमिनीवर दावा असून आपल्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वी देखील केली आहे. मात्र आता 13 डिसिमल जमीन अमर्त्य सेन यांना आपल्या अवैध कब्जातून 6 मे 2023 पर्यंत विद्यापीठाच्या ताब्यात द्यावी लागणार आहे.

    Visva Bharati University in an eviction order has asked Nobel laureate Amartya Sen to vacate the 13 decimals of land

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार