विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : समर्थ भारताच्या पुढच्या 1000 वर्षांच्या प्रगतीचा मूलमंत्र आणि संकल्प देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात काही योजनांच्या घोषणा केल्या. त्यामध्ये विश्वकर्मा योजना अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे. Vishwakarma Yojana pm modi declare in delhi
पंतप्रधान मोदींनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबांपर्यंत पोहोचलेल्या सर्व योजनांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच, ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी देशवासियांना गृहनिर्माण योजना ते स्वनिधी योजनेच्या यशाबद्दल सांगितले
नव्या योजनेचा कोणाला फायदा?
येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करेल. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी, चर्मकार आदी पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केली जाईल.
या विश्वकर्मा योजनेत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुद्रा योजनेचा लाभ 8 कोटी तरुणांना
पीएम मोदी म्हणाले की, मुद्रा योजनेतून तरुणांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतून आठ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येक व्यवसायानं 1-2 लोकांना रोजगार दिला आहे.
देशाच्या युवा शक्तीवर माझा विश्वास आहे, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. युवाशक्तीमध्ये क्षमता आहे आणि त्याच युवाशक्तीला अधिक बळ देण्याचं आमचं धोरण आहे. आपल्या देशातील तरुणांनी भारताला जगातील पहिल्या 3 स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवून दिलं आहे. आज जगभरातील तरुण भारताची ही क्षमता पाहून आश्चर्यचकित झाले आहेत, असंही मोदी म्हणाले.
Vishwakarma Yojana pm modi declare in delhi
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!