• Download App
    विश्व संवाद केंद्राचे "हमारा व्हिक्टरी पंच" गाणे भारतीय ऑलिम्पिक वीरांसाठी समर्पित Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players

    विश्व संवाद केंद्राचे “हमारा व्हिक्टरी पंच” गाणे भारतीय ऑलिम्पिक वीरांसाठी समर्पित

    प्रतिनिधी

    मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी  विश्व संवाद केंद्र, मुंबई च्या वतीने ‘हमारा व्हिक्टरी पंच’ हे गाणे समर्पित करण्यात आले आहे. हे गीत प्रसिद्ध गीतकार रश्मी-विराग मिश्रा यांनी  लिहिले आहे.  Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players

    ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये  सहभागी होऊन भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरणाऱ्या सर्व खेळाडूंना  तसेच आजपासून सुरु झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.  केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतवासीयांना व्हिडिओ तयार करण्याचे आवाहन केले होते.



    टोकियो ऑलिम्पिक  स्पर्धांना २३  जुलैपासून जपानमध्ये सुरुवात झाली आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धांसाठी भारतातील प्रस्थापित तसेच नवोदित असे १२६  खेळाडू टोक्योमध्ये रवाना झाले आहेत.

    Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : आरक्षणासाठी जाट समाजातून बौद्ध बनले; हा नवीन फ्रॉड! सुप्रीम कोर्टाने हरियाणा सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

    Economic Survey : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस, आज आर्थिक सर्वेक्षण सादर होईल, काल राष्ट्रपतींनी अभिभाषण दिले

    President Murmu : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस; राष्ट्रपती मुर्मू यांच्या भाषणाने सत्राची सुरुवात होईल, 2 एप्रिलपर्यंत चालणार