प्रतिनिधी
मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विश्व संवाद केंद्र, मुंबई च्या वतीने ‘हमारा व्हिक्टरी पंच’ हे गाणे समर्पित करण्यात आले आहे. हे गीत प्रसिद्ध गीतकार रश्मी-विराग मिश्रा यांनी लिहिले आहे. Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players
ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरणाऱ्या सर्व खेळाडूंना तसेच आजपासून सुरु झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतवासीयांना व्हिडिओ तयार करण्याचे आवाहन केले होते.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांना २३ जुलैपासून जपानमध्ये सुरुवात झाली आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धांसाठी भारतातील प्रस्थापित तसेच नवोदित असे १२६ खेळाडू टोक्योमध्ये रवाना झाले आहेत.
Vishwa samvad kendra, Mumbai dedicates song to Indian Olympic players
महत्त्वाच्या बातम्या
-
- निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा तपास करण्यात पश्चिम बंगाल सरकार अपयशी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला फटकारले
- राज कुंद्राला अश्लिल चित्रपट इंडस्ट्री बॉलवूडइतकीच मोठी करायची होती
- लोकल बंदीमुळे हैराण मुंबईकरांच्या संतापाला राज ठाकरे यांनी फोडली वाचा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आता सहन करण्याची क्षमता संपत चालली