वृत्तसंस्था
हैद्राबाद : हिंदू मंदिरे आणि धार्मिक संस्थांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी कायदा करण्याची विनंती विश्व हिंदू परिषदेने केंद्राकडे केली आहे.यासोबतच धर्मांतरविरोधी कायद्याचीही मागणी संघटनेने केली आहे.Vishwa Hindu Parishad: Urge to legislate to free Hindu temples from government control
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी रविवारी येथे सांगितले की, संघटनेने सर्व राज्य सरकारांना हिंदू मंदिरे हिंदू समाजाच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले आहे.
तसेच केंद्र सरकारला या संदर्भात कायदा आणण्याची विनंती केली आहे.धर्मांतरांवर चिंता व्यक्त करत त्यांनी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतराचा दावा केला.
हे धर्मांतर प्रलोभन, फसवणूक आणि भीतीने केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषद अशा धर्मांतराला कडाडून विरोध करेल आणि धर्मांतरित बंधू-भगिनींना हिंदू धर्मात परत आणण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करेल.कुमार म्हणाले की, तेलंगणा सरकारने उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांप्रमाणे धर्मांतरविरोधी कायदेही केले पाहिजेत.
पुढे आलोक कुमार म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारला धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात आम्ही सरकारला निवेदनही दिले आहे.सरकार यावर विचार करेल अशी आशा आहे.
या दोन्ही मुद्द्यांवर विश्व हिंदू परिषद जनजागृती कार्यक्रम राबवणार असल्याचे कुमार म्हणाले. त्यांनी तेलंगणा सरकारने गायी आणि त्यांच्या संततीच्या संरक्षणासाठी कायदा आणण्याची मागणी केली. तेलंगणा राज्यात गायींच्या हत्येच्या घटना वाढत आहेत.
Vishwa Hindu Parishad: Urge to legislate to free Hindu temples from government control
महत्त्वाच्या बातम्या
- देशप्रेमाची शिक्षा! पाकिस्तानच्या विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांना विरोध केला म्हणून चार विद्यार्थ्यांना काढले होस्टेलबाहेर
- वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्या मध्यस्ताला सीबीआयने ठोकल्या बेड्या
- ममतांचे नेमके इरादे काय? त्या काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला पर्यायी नेतृत्व ठरू शकतील?
- एसटी कर्मचारी आज कामावर रुजू न झाल्यास बडतर्फ केले जाणार ; अनिल परब यांचा इशारा