वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने देशातली मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्त करायचे आंदोलन सुरू केले असून 5 जानेवारीला आंध्र प्रदेशातून या आंदोलनाचा प्रारंभ होणार आहे 5 जानेवारी 2025 रोजी विजयवाड्यामध्ये मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्ती संदर्भातल्या जनजागृती मोहिमेची पहिली सभा होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशभर अशा सहभाग घेत मोठी जनजागृती करण्यात येणार आहे. Vishwa Hindu Parishad movement
देशभरातल्या मंदिरांवरचे सरकारी नियंत्रण उठवावे. मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावीत. मंदिरांच्या व्यवस्थापनात अनुसूचित जाती जमाती यांच्यासह जास्तीत जास्त हिंदू समाज घटकांचा समावेश करावा. हिंदू नसलेल्या घटकांना मंदिरांच्या जमिनी अथवा मालमत्ता व्यवस्थापनात स्थान असू नये. त्याचबरोबर त्यांना त्याचे वाटपही करू नये. मंदिरांचा निधी हा हिंदू समाज घटकांसाठी विविध सेवा कार्यांसाठी खर्च व्हावा. तो अहिंदू समाजासाठी त्यांच्या कुठल्या कार्यासाठी परस्पर सरकारने खर्च करू नये अशा विविध मागण्या विश्व हिंदू परिषदेने केल्या आहेत.
सुप्रिया सुळेंनी सांगून देखील युगेंद्र पवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज मागे घेतलाच नाही??
या सर्व संदर्भांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी देशभर मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्ती आंदोलन सुरू करण्यात आले आहे. देशातल्या विविध राज्य सरकारांना मंदिरे कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने काही प्रारूप दिले असून त्या विषयाची चर्चा देखील जनजागृती दरम्यान होणाऱ्या सभांमधून करण्यात येणार आहे.
तिरुपती सारख्या मोठ्या मंदिरांच्या व्यवस्थापनामध्ये ख्रिश्चन समुदायातल्या नेत्यांना स्थान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेची मंदिरे सरकारी नियंत्रण मुक्ती मोहीम आता वेग घेणार आहे.
Vishwa Hindu Parishad movement
महत्वाच्या बातम्या
- वाल्मीक कराडसह 4 फरार आरोपींची बँक खाती सील; शेवटचे लोकेशन उज्जैनमध्ये, नंतर गायब
- 2025 मध्ये वर्षभर अमित शाह काँग्रेसच्या टार्गेटवर; पक्षाचे नेते “नवा मोदी” बनवायच्या असाईनमेंट वर!!
- Manipur : मणिपूरमध्ये सलग 5व्या दिवशी गोळीबारात महिला व पत्रकार जखमी; CM म्हणाले- कुकी अतिरेक्यांचा शांतता-सौहार्दावर हल्ला
- Pandharpur : पंढरपूर जवळ भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात