विशेष प्रतिनिधी
रायपूर : छत्तीसगड मध्ये माध्यमांना अनपेक्षित असलेली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपने तिथे शांतपणे खांदेपालट घडवून आणला आहे. डॉ. रमण सिंह यांच्या ऐवजी पुढच्या पिढीतले भाजपचे नेते विष्णूदेव साय यांची मुख्यमंत्री पदावर निवड केली आहे. vishnu deo sai new chief minister of chhatisgarh
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक रायपूर मध्ये झाली. त्याला केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनवाल, ओम प्रकाश माथुर आणि अर्जुन मुंडा उपस्थित होते. या बैठकीत सर्व आमदारांनी सर्व संमतीने विष्णुदेव साय यांच्या नावाला पसंती दिली आणि त्यांची निवड मुख्यमंत्रीपदावर झाली.
छत्तीसगडमध्ये भाजपने कोणत्याही नेत्याचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जनतेसमोर ठेवला नव्हता. पंतप्रधान नेतृत्व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सामुदायिक नेतृत्वाच्या आधारे छत्तीसगडमध्ये निवडणुकीला सामोरा गेला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष पद विष्णुदेव साय यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच होतेच. त्यांच्या रूपाने छत्तीसगडमध्ये एक ओबीसी चेहरा भाजपने मुख्यमंत्री पदावर आणला आहे.
विष्णुदेव साय भाजपचे जेष्ठ नेते आहेतच, पण अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय राज्यमंत्री देखील राहिले होते. त्यांच्या राजकीय अनुभवाचा छत्तीसगड मधले सरकार चालवण्यात भाजपला चांगला उपयोग होईल, असे वक्तव्य ओम प्रकाश माथूर यांनी केले.
मध्य प्रदेश, राजस्थानात बदलाच्या अटकळी
भाजपने छत्तीसगडमध्ये खांदेपालट केल्यानंतर आता मध्य प्रदेश आणि राजस्थानातही असाच खांदेपालट करणार, अशा अटकळी बांधल्या जाऊ लागल्या आहेत. छत्तीसगडमध्ये रमणसिंग दोनदा मुख्यमंत्री झाले, तसेच मध्य प्रदेशात शिवराज सिंह आणि राजस्थान वसुंधरा राजे यांनाही भाजपने मुख्यमंत्री पदाचे अनेकदा संधी दिली. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये छत्तीसगड सारखाच बदल करण्याचे घाटत असल्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे.
vishnu deo sai new chief minister of chhatisgarh
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगेंची नेत्यांना पायाखाली तुडवण्याची भाषा; फडणवीसांना उघडे पाडण्याचा दिला इशारा!!
- कँटीनची नोकरीही सोडली, वाटेत भेटणाऱ्या लोकांना अयोध्येला येण्याचे देत आहे निमंत्रण
- 3 दिवसांत 300 कोटी, अद्यापही नोटांची मोजणी सुरूच; काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या आवारात सापडला कुबेराचा खजिना
- दिल्लीच्या ‘VVIP’ वसंत कुंज परिसरात चकमक, लॉरेन्स गँगच्या दोन शूटर्सला अटक