विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्याची शासन असलेला आणि सलग 19 वर्षे सेवा बजावणारा विराट हा घोडा प्रजासत्ताक दिनी निवृत्त झाला. राजपथ येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाची सांगता झाल्यानंतर लगेचच, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षक ताफ्यातील सदस्य असलेल्या विराटला सेवानिवृत्त केले. वयाच्या तिसºया वर्षापासून विराट सेवा बजावत होता.Virat, who has been serving at the Rashtrapati Bhavan since the age of three, has retired after 19 years
विराटला त्याच्या गुणवत्ता आणि सेवांसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडमेंट कार्ड देण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यात विराटची विशेष भूमिका होती. यामुळेच निवृत्तीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विराटकडे जाऊन त्याची पाठ थोपटली.
राष्ट्रपतींच्या ताफ्यातील हा सामान्य घोडा नसून राष्ट्रपतींच्या अंगरक्षक कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य आहे, ज्याला राष्ट्रपतींचे अंगरक्षक चार्जर असेही म्हणतात.विराट 13 वेळा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाला आहे आणि जवळपास 19 वर्षांपासून सेवेत आहे.
राष्ट्रपतींना आपला अंतिम एस्कॉर्ट सादर केला.15 जानेवारी रोजी विराटला चीफ आॅफ आर्मी स्टाफ कमेंडेशन मेडल असाधारण सेवा आणि क्षमतांसाठी देण्यात आले होते. अशा प्रकारचे मेडल मिळविणारा विराट हा पहिला घोडा आहे.
विराट हा हॅनोवेरियन जातीचा घोडा 2003 मध्ये अंगरक्षक कुटुंबात सामील झाला होता. नावाप्रमाणेच हा घोडा अतिशय ज्येष्ठ, शिस्तप्रिय आणि आकर्षक उंचीचा आहे. हेमपूर येथील रिमाउंट ट्रेनिंग स्कूल आणि डेपोमधून हा घोडा 2003 मध्ये वयाच्या तिसºया वर्षी येथे आणण्यात आला होता.
Virat, who has been serving at the Rashtrapati Bhavan since the age of three, has retired after 19 years
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातून गुन्हेगारीचा उच्चाटन करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आता गॅँगस्टरच्या पत्नी उतरल्या
- तुम्ही आता राज्यच केंद्राला चालविण्यासाठी द्या, चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
- टीसीएसने रचला इतिहास : अमेरिकेच्या आयबीएमला पछाडत बनली दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी, इन्फोसिस वेगाने वाढणारा ब्रँड