• Download App
    Virat Kohli विराट कोहली अडचणीत! पब-रेस्टॉरंटवर मोठी कारवाई, कोणत्या आरोपांवर गुन्हा दाखल?

    विराट कोहली अडचणीत! पब-रेस्टॉरंटवर मोठी कारवाई, कोणत्या आरोपांवर गुन्हा दाखल?

    कोहलीच्या पबवर कायदेशीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या पब-रेस्टॉरंटवर बंगळुरू पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी कोहलीच्या One8 Commune पब आणि रेस्टॉरंमध्ये नो स्मोकिंग झोन नसल्याबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी,या प्रकरणात विराट किंवा रेस्टॉरंटकडून अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आलेले नाही.

    बंगळुरूच्या क्यूबन पार्क पोलिसांनी एका विशेष मोहिमेदरम्यान एकूण ५ बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. ज्यामध्ये विराट कोहलीच्या मालकीचा One8 Commune पब आणि रेस्टॉरंटचा समावेश आहे. पोलिसांना आढळले की या पबमध्ये नो स्मोकिंग झोन नाही, म्हणून सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमाच्या (COTPA) तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    कोहलीच्या पबवर कायदेशीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी देखील जुलैमध्ये One8 Commune पब आणि रेस्टॉरंटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुलै २०२४ मध्ये, One8 Commune पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब बंद होण्याच्या वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला होता.

    क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कस्तुरबा रोडवरील वन८ कम्यून पब बंद होण्याच्या वेळेनंतर ६ जुलै रोजी मध्यरात्री १:२० वाजता उघडा होता आणि ग्राहकांना सेवा देत होता. त्याचेवळीगस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला तक्रार मिळाली होती की वन८ कम्यून पब रात्री उशिरापर्यंत उघडा आहे. पोलिस पथक पबमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना पब सुरू असल्याचे आढळले होते.

    त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. विराट कोहली हा वन८ कम्यून पबचा मालक आहे. त्याच्या दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता, गुरुग्राम अशा शहरांमध्ये शाखा आहेत. हे रेस्टॉरंट डिसेंबर २०२३ मध्येच बंगळुरूमध्ये उघडण्यात आलेले आहे.

    Virat Kohli in trouble Big action against One8 Commune pub-restaurant

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharmistha Panoli : अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्यांच्या भावना दुखावणे नाही, शर्मिष्ठा पनोलीला जामीन देण्यास कोलकाता उच्च न्यायालयाचा नकार

    IPL मधल्या विजयाने RCB चा 18 वर्षांचा उपवास सुटला, विराट कोहलीला शांत झोप लागली!!

    Indian army : पाकिस्तानच्या वल्गनेला अवघ्या आठ तासांत भारतीय लष्कराने केले नेस्तनाबूत