• Download App
    विराट कोहली ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत Virat Kohli in the list of legendary players who played 500 international matches

    विराट कोहली ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत

    जाणून घ्या, आतापर्यंत ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले टॉप 10 खेळाडू कोण आहेत?

    विशेष प्रतिनिधी

    त्रिनिदाद :  भारतीय  क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि  धडाकेबाज फलंदाच रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघात त्रिनिदाद येथे दुसरा कसोटी सामना सुरू असून, हा दोन्ही संघातील १००वा कसोटी सामना आहे. तर, विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीयकारकीर्दीतील हा ५०० वा सामना ठरला आहे.  Virat Kohli in the list of legendary players who played 500 international matches

    यामुळे विराट कोहली आता ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत पोहचला आहे. या निमित्त जाणून घेऊयात आतापर्यंत असा विक्रम कोणत्या खेळाडूंच्या नावावर आहे आणि यादीत अव्वलस्थानी कोण आहे.

    भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दहावा क्रिकेटपटू ठरला आहे. तर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने (६६४) खेळण्याचा विक्रम मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

    यानंतर श्रीलंकेचे महेला जयवर्धने (६५२), कुमार संगकारा (५९४), सनथ जयसूर्या (५८६), ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (५६०), भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (५३८), पाकिस्तानचा अष्टपैलु खेळाडू शाहिद आफ्रिदी (५२४), दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलु  खेळाडू जॅक कॅलिस (५१९) आणि भारताचा माजी खेळाडू  राहुल द्रविड (५०९) यांचे यादीत अनुक्रमे नाव येते.

    Virat Kohli in the list of legendary players who played 500 international matches

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू